Bihar Assembly Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या निवडणूक संचालन समितीच्या पहिल्या बैठकीत भाजपने बिहारमधील आमदारांची संख्या 3 अंकी करण्याचे लक्ष्य ठेवलं आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पक्षातील सर्व नेत्यांना मार्गदर्शन केलं.
दरम्यान, बिहार प्रभारी भूपेंद्र यादव यांनी भाजप आमदारांची संख्या तीन अंकी करण्यासाठी सर्व नागरिकांपर्यंत पोहचण्याचे आवाहन केले. याशिवाय सर्व नेत्यांनी गावा-गावात जाऊन जनसमर्थन तयार करण्याच्या सुचना दिल्या. या बैठकीला निवडणूक संचालक समितीमधील 61 जणांनी सहभाग नोंदवला होता. (हेही वाचा -Devendra Fadnavis On Eknath Khadse: 'मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही' भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांचे प्रत्युत्तर)
बिहार प्रदेश पदाधिकारियों के एक बैठक में भी हमारे @BJP4India के राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. पी. नड्डा जी के साथ सम्मिलित हुआ।
Also attended @BJP4Bihar State Executive Meeting chaired by our Rashtriya Adhyaksh Hon @JPNadda ji in Patna this evening. pic.twitter.com/AgbnDe9O5o
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 11, 2020
दरम्यान, देवेंद्र फडणवीस शनिवारपासून पक्षाच्या जमीनी निवडणूक अभियानाला सुरुवात करणार आहेत. फडणवीस बिहारमधील आरा, जहानाबाद, गया, पूर्णिया आणि कटिहार जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. शनिवार देवेंद्र फडणवीस जेपी नड्डा यांच्यासोबत आत्मनिर्भर बिहार अभियानाची सुरुवात करणार आहेत. याशिवाय 13 सप्टेंबरला फडणवीस कृषी मंत्री प्रेम कुमार यांच्यासोबत गया येथे जाणार आहेत.