Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. 8 महिन्यांच्या गरोदर सुनेचे पोट कापून सासरच्यांनी मुलाला बाहेर काढले. हे काम स्मशानभूमीतील एका सफाई कामगाराने केल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने मृतदेहाचे पोट ब्लेडने फाडून पोटातून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर सुनेवर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि मुलाचा मृतदेह देखील स्मशानभूमीत स्वतंत्रपणे पुरण्यात आला. स्मशानभूमीत जाळण्यापूर्वी सासरच्यांनी महिलेचे मृतदेहाचे पोट ब्लेडने फाडले. पोटात मूल जिवंत आहे की, मेले हे त्यांना पाहायचे होते. मात्र बालकही मृत झाल्याचे समजताच त्याचा मृतदेहही पुरण्यात आला. जबलपूरमधील बारेलाच्या पडवार येथे राहणाऱ्या राधा लोधीचा विवाह 24 एप्रिल 2021 रोजी पानगर येथील गोपी पटेलसोबत झाला होता. लग्नानंतर राधाचा सासरच्या मंडळींकडून छळ केला जात होता.
दरम्यान, 17 सप्टेंबर रोजी त्याचा संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. ही माहिती राधाच्या पालकांना देण्यात आली नाही. मात्र माहिती मिळताच राधाचे नातेवाईक घटनास्थळी पोहोचले, मात्र सासरच्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. मृतकासोबत हे क्रूर कृत्य करत असताना सासरच्यांनी मोबाईलवरून व्हिडिओ बनवला. जो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पुरुष मृत गर्भवती महिलेचे पोट ब्लेडने फाडत आहे आणि त्यातून मृत नवजात अर्भक बाहेर काढत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ही घटना दीड महिन्याची असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा -Kerala High Court on Woman’s Attire: महिलांचा पोशाख पुरुषाला तिचा विनयभंग करण्याचा परवाना देत नाही; केरळ उच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिपण्णी)
जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाला याची माहिती मिळताच एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांचा आरोप आहे की, मृत्यूच्या एक दिवस आधीही राधाचा सासरच्यांसोबत वाद झाला होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. त्याचवेळी हा व्हिडिओ समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी एसपी कार्यालय गाठून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आणि न्याय मिळावा, अशी विनंती केली.
तक्रार घेऊन आलेल्या मृताची आई गौराबाई यांनी सांगितले की, लग्न झाल्यापासून सासरचे लोक हुंड्यात दुचाकीची मागणी करत होते. मुलगी राधा 8 महिन्यांची गरोदर होती. आणि 17 सप्टेंबर रोजी तिचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. मुलीचे पोट फाडतानाचा व्हिडिओ गौराबाई यांनी बुधवारी तक्रारीसोबत पोलिसांना दिला आहे. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कायदेशीर सल्ला घेत असल्याचे सांगितले.
आईने सांगितले की, सासरच्या लोकांच्या माहितीवरून आम्हीही स्मशानभूमीत पोहोचलो. तेथे सासरच्यांच्या सांगण्यावरून सफाई कामगाराने मुलीच्या पोटात छिद्र पाडले. सफाई कामगाराने एकामागून एक अनेक वेळा पोटात ब्लेड चालवून बाळाला काढण्याचा प्रयत्न केला. बाळाची नाळ बाहेर आली. यानंतर बाळाची नाळ कापून बाळाला बाहेर काढण्यात आले. आणि मग मृत बाळाचा मृतदेह पुरण्यात आला.