Danish Chikna Arrested in Rajasthan: गँगस्टर दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश चिकना याला राजस्थानमध्ये अटक; मुंबईतील डोंगरी परिसरात चालवत होता ड्रग्ज फॅक्टरी
Danish Chikna (PC - ANI)

Danish Chikna Arrested in Rajasthan: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक दानिश चिकना (Danish Chikna) याला राजस्थानातून (Rajasthan) अटक करण्यात आली आहे. मुंबई एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार दानिशला कोटा येथून अटक करण्यात आली आहे. दानिश चिकना मुंबईतील डोंगरी भागात ड्रग्स फॅक्टरी चालवत होता. त्याच्यावर मुंबईच्या डोंगरी पोलिस ठाण्यात 6 गुन्हे दाखल आहेत.

एनसीबीच्या म्हणण्यानुसार, नुकत्याच मुंबईत झालेल्या छाप्या दरम्यान एनसीबीने दाऊदचा दुसरा हस्तक चिंकू पठाणला अटक केली होती. चिंचू पठाण यांच्या चौकशीदरम्यान दानिश चिकनाचे नाव समोर आले होते. (वाचा - नायजेरियातील 2 ड्रग पेडर्संना मुंबईत अटक; 1.5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त)

मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा दानिशला अटक करण्यासाठी एनसीबी पथक कारखान्यात पोहोचले, तेव्हा त्याने भिंतीवरुन उडी मारुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण एनसीबीच्या टीमने त्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. दानिश चिकना राजस्थानमध्ये असल्याचं समजताचं एनसीबीच्या पथकाने दानिशला अजमेरमध्ये घेराव घातला होता. मात्र, तेव्हा तो तेथूनही पळून गेला होता. पण नंतर तो कोटामध्ये असल्याचं एनसीबीला समजलं. त्यानंतर एनसीबीने कारवाई करत दानिशला अटक केली.