Petrol Diesel Price Today: कच्च्या तेलाच्या किमती (Crude Oil Prices) पुन्हा एकदा प्रति बॅरल 90 डॉलरच्या पुढे गेल्या आहेत. क्रूड ऑइल बेंचमार्क ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल 90.65 डॉलर वर चालू आहे, तर WTI क्रूडचा दर प्रति बॅरल 87.51 डॉलर आहे. कच्च्या तेलात वाढ होण्याचे कारण म्हणजे सौदी अरेबिया आणि रशियाकडून उत्पादनात झालेली घट. कच्च्या तेलातील चढ-उताराचा पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईसह जवळपास सर्व प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखेच आहेत. (हेही वाचा - G20 Summit 2023: आजपासून दिल्लीत दोन दिवसीय G-20 शिखर परिषदेला सुरूवात)
दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर -
- दिल्लीत एक लिटर पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
- कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 92.76 रुपये दराने विकले जात आहे.
- मुंबईत एक लिटर पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल 94.24 रुपये दराने विकले जात आहे.
इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
- नोएडामध्ये पेट्रोल 96.77 रुपये आणि डिझेल 89.94 रुपये प्रति लिटर
- गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.10 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लिटर
- हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लिटर आहे
- चंदीगडमध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लिटर आहे.
- पाटण्यात पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लिटर आहे
- लखनौमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लिटर आहे
- जयपूरमध्ये पेट्रोल 108.08 रुपये आणि डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर आहे
- बेंगळुरूमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लिटर आहे
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात. कच्च्या तेलाच्या किमती व्यतिरिक्त केंद्र आणि राज्य सरकारचे कर, वाहतूक खर्च आणि डीलर कमिशन इत्यादींचा यात समावेश आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, तुम्ही 92249 92249 वर एसएमएस पाठवून पेट्रोल आणि डिझेलची किंमत जाणून घेऊ शकता.