पीएफ खातेदारांना दिलासा; कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रोजगार मंत्रालयाची मोठी घोषणा
EPFO (Photo Credits-Facebook)

कोरोना विषाणूने (Covid-19) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सर्वसामान्यप्रमाणे इतर नागरिकांनाही आर्थिक आणि इतर अडचणींचा सामना करावा लागत आहे. यातच 24 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांकरिता देशात संचारबंदीची (Lockdown) घोषणा केली. दरम्यान, संचारबंदीचा नोकर वर्गाला याचा मोठा फटका बसला असल्याचे दिसत आहे. यातच रोजगार मंत्रालयाने महत्वाचा निर्णय घेतला असून पीएफ संदर्भात मोठी घोषणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशात 6 कोटी नागरिक आपल्या पीएफच्या (Employees Provident Fund Organization) खात्यातून पैसे काढू शकतात. यासाठी रोजगार मंत्रालयाकडून नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. याचा फायदा पीएफ खातेदारांना मिळणार आहे.

कोरोना विषाणून सर्वत्र हाहाकार माजवला आहे. यातच कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी रोजगार मंत्रालयात पीएफमध्ये मोठा बदल केला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी भविष्य निर्वाह निधी योजनेचे सदस्य असलेल्या सर्व कामगारांना अनिवार्य परताव्याशिवाय भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढता येणार आहे. रविवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून अधिसूचना जारी केली आहे. या नव्या सुधारणेनुसार 3 महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कम किंवा कामगाराच्या खात्यात एकूण जमा निधीच्या 75% पर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल ती त्या कामगाराला मिळू शकेल आणि ही रक्कम परत करणे अनिवार्य नसेल. कामगार मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केल्यानंतर, यासंदर्भात सदस्यांकडून आलेल्या अर्जांवर तातडीने योग्य कारवाई करण्याचे आदेश कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत. हे देखील वाचा- Coronavirus: महाराष्ट्रात आढळले आणखी 12 नवे रुग्ण ; राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 215 वर

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरुवातीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात जमावबंदी कायदा लागू केला होता. त्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी 24 मार्च रोजी संपूर्ण देशात 21 दिवसांकरिता संचारबंदी घोषीत केली. जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या 6 लाख 81 हजार 706 वर पोहचली आहे. यांपैकी 31 हजार 882 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 45 हजार 696 रुग्ण बरे झाल्याची माहिती समोर आली आहे. आता भारतही कोरोना विषाणूच्या जाळ्यात अडकत चालला असल्याची चिन्ह दिसू लागली आहे. भारतात आतापर्यंत एकूण 1 हजार 24 कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यांपैकी 29 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 96 लोक बरे झाले आहेत. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीतांची संख्या 215 वर पोहचली आहे. यात 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 35 रुग्ण कोरोना विषाणूच्या जाळ्यातून बाहेर आल्याचे समजत आहे.