शनिवारी, 25 एप्रिल पर्यंत भारतातील परदेशी नागरिकांसह कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झालेल्या रुग्णांची संख्या 24,942 वर गेली आहे. शनिवारी आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात कोविड-19 मुळे 779 मृत्यूमुखी पडले आहेत आणि, तर एकूण 18,953 सक्रिय रुग्ण आहेत. शिवाय, कोरोनाची 1490 नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर या विषाणूमुळे 56 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनामुळे संक्रमित 249 लोक बरे झाले आहेत. अशा प्रकारे, आजवर 5210 रूग्ण या धोकादायक आजाराने बरे झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचा संसर्ग सुरु झाल्यापासून रुग्णांच्या वाडीचा दर मंदावला आहे. कोविड-19 (COVID-19) चाचणीचं प्रमाण वाढल्यानंतरही भारतात कोरोनाचे रुग्ण आवाक्याबाहेर वाढलेले नाहीत, ही चांगली गोष्ट आहे, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. (मुंबई: धारावीत आणखी 21 नवे कोरोनाबाधीत आढळले; आतापर्यंत 241 लोकांना संसर्ग तर, 14 जणांचा मृत्यू)
मंत्रिमंडळाच्या गटाचीआज बैठक झाली, ज्यात भारतातल्या कोरोना व्हायरबद्दल चर्चा करण्यात आली. देशात सध्या कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचं प्रमाण 3.1% आहे. हा मृत्यूदर इतर काही देशांच्या तुलनेत कमी आहे. कोरोना रुग्नांच्या बरं होण्याचं प्रमाणही वाढत आहे. सध्या हे प्रमाण 20 टक्क्यांहून अधिक आहे. इतर युरोपीय देशांच्या तुलनेत हे सुद्धा चांगलं असल्याचं मंत्रिगटाच्या बैठकीत सांगितलं गेलं. महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे सर्वाधिक 6817 रुग्ण आहेत. त्यानंतर गुजरातमध्ये 2815 आणि दिल्लीत 2514 कोरोना रुग्ण आहेत.
India's total number of #Coronavirus positive cases rises to 24,942 (including 18,953 active cases, 5210 cured/discharged/migrated and 779 deaths): Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/6sIlB91A2T
— ANI (@ANI) April 25, 2020
कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आले आहे. हे लॉकडाउन 3 मे पर्यंत सुरू राहील. लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकारने दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे. याबाबत गृहमंत्रालयाने शनिवारी स्पष्टीकरण जारी केले आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की ग्रामीण भागात शॉपिंग मॉलची दुकाने वगळता सर्व दुकाने उघडली जातील. शिवाय, शहरी भागातील रहिवासी संकुलांमध्ये असलेली सर्व स्टँडअलोन (एकट्या) दुकाने, अतिपरिचित दुकाने उघडण्यास परवानगी आहे. या आदेशात म्हटले आहे की बाजारपेठेत स्थित दुकाने, मार्केट कॉम्प्लेक्स आणि शॉपिंग मॉल उघडण्यास परवानगी नाही. दरम्यान, 27 एप्रिल रोज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्याच्या सर्व मुख्यमंत्रांसोबत बैठक घेतील. यात राज्यातील कोरोना संबंधित गोष्टींवर चर्चा केली जाईल.