FIR Against Sonia Gandhi: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांना ‘Poor Lady’ असे संबोधल्याबद्दल बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे. शनिवारी सीजीएम कोर्टात सुधीर ओझा नावाच्या वकिलाने ही तक्रार दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी 10 फेब्रुवारी रोजी होणार आहे. याचिकाकर्त्याने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वढेरा यांचेही सह-आरोपी म्हणून नाव दिले आहे. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
द्रौपदी मुर्मू यांचा अपमान करण्याचा प्रयत्न -
याचिकाकर्ते सुधीर ओझा यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर केलेले भाष्य अत्यंत आक्षेपार्ह होते. राष्ट्रपती एक महिला आहेत आणि आदिवासी समुदायातून येतात, त्यांच्याविरुद्धची ही टिप्पणी आक्षेपार्ह आहे. (हेही वाचा -Defamation Case On Rahul Gandhi: मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर)
सोनिया गांधींची द्रौपदी मुर्मू यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी -
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणानंतर सोनिया गांधी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, बिचाऱ्या बाई शेवटी थकल्या होत्या. त्याच वेळी, राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींचे अभिभाषण कंटाळवाणे म्हटले होते. सोनियांच्या या विधानामुळे राजकीय खळबळ उडाली. सोनियांच्या या वक्तव्याचा भाजपने तीव्र निषेध केला. यानंतर पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. राष्ट्रपती भवनाने याला दुर्दैवी आणि अपमानास्पद टिप्पणी म्हटले. (हेही वाचा - FIR Against Rahul Gandhi In Assam: आसाममध्ये राहुल गांधींविरुद्ध गुन्हा दाखल; 'इंडियन स्टेट'शी लढण्याच्या विधानावरून कारवाई)
सोनियांच्या टिप्पणीवर पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
सोनिया गांधी यांच्या टिप्पणीबाबत पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज देशाने पुन्हा एकदा काँग्रेस राजघराण्याचा अहंकार पाहिला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांनी संसदेत भाषण केले. त्यांनी देशवासीयांना विकसित भारताच्या यशाबद्दल आणि स्वप्नाबद्दल सांगितले. हिंदी त्यांची मातृभाषा नाही, तरीही त्यांनी खूप चांगले भाषण दिले. पण काँग्रेसच्या राजघराण्याने त्यांचा अपमान करायला सुरुवात केली आहे. हा देशातील आदिवासी बंधू-भगिनींचा अपमान आहे.