Jammu-Kashmir Cloudburst: जम्मू -काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात ढगफुटी, घटनेत एकाचा मृत्यू, अद्याप काही जण बेपत्ता
Cloudburst | Representational Image (Photo Credits: Pixabay)

जम्मू -काश्मीरच्या (Jammu and Kashmir) बारामुल्ला (Baramulla) जिल्ह्यातील काफरनर बहाक परिसरात ढगफुटी (Cloudburst) झाल्याची माहिती आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू (Dead) झाला आहे. तर इतर ढगफुटीमुळे उद्भवलेल्या फ्लॅश फ्लडमध्ये बेपत्ता झाले आहेत. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ढगफुटीमुळे अचानक पूर काफरनारपर्यंत (Kafarnar) आला. ज्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ते म्हणाले की राजौरीच्या हाजी बशीर बकरवाल नावाच्या कुटुंबातील सदस्याचा मृतदेह सापडला आहे. तर इतरांचा शोध लागला नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शोधमोहीम सुरू आहे आणि हा परिसर अतिशय दुर्गम आहे. त्यामुळे मोबाईल कनेक्टिव्हिटीही कमकुवत आहे. दरम्यान अन्य एका घटनेत कुलगाम पोलिसांनी (Kulgam Police) सांगितले की, त्यांनी याथूर नाल्यातून एका कुटुंबातील पाच सदस्यांची सुटका केली आहे. कारण ते या भागात कालपासून मुसळधार पावसामुळे अडकले होते.

त्याचवेळी पोलिस प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, कुलगाम पोलिसांना आज सकाळी 6 च्या सुमारास माहिती मिळाली की 11-12 सप्टेंबरच्या मध्यरात्री झालेल्या संततधार पावसामुळे नाला याथूर येथील पाण्याची पातळी अचानक वाढली आहे आणि कुटुंब त्यांची जनावरे घेऊन जात होते. यासह ते नाल्याच्या मध्यभागी अडकले होते. सर्वांची सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजौरी जिल्ह्यात बकरवाल आदिवासी समुदायाचे पाच सदस्य बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. जम्मू -काश्मीर सरकारच्या अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा हवाला देत एएनआय वृत्तसंस्थेने सांगितले की अधिकारी या घटनेच्या अधिक तपशीलाची वाट पाहत आहेत. यावर्षी जुलैच्या सुरुवातीला जम्मू -काश्मीरच्या किश्तवाडमध्ये ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला होता. या अपघातात 6 लोकांचा मृत्यू झाला आणि 40 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. 
ढगफुटीच्या घटनेत बेपत्ता किंवा संभाव्यत: मृत व्यक्तींची संख्या अद्याप अधिकृतपणे माहिती दिली गेली नसली तरी, सुरुवातीला नोंदवल्या जाणाऱ्यापेक्षा जास्त आकडेवारीची शक्यता अद्याप नाकारता येत नाही.