Bhupesh Baghel (PC - Facebook)

Chhattisgarh Elections 2023: छत्तीसगडमध्ये मतदानाचा एक टप्पा पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी रविवारी म्हणजेच दिवाळीला मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी मोठी घोषणा केली. बघेल यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'आज दिवाळीच्या शुभमुहूर्तावर माता लक्ष्मीजींच्या आशीर्वादाने आणि छत्तीसगढ माहातरी यांच्या आशीर्वादाने राज्यातील महिला शक्तीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेसचे सरकार स्थापन होताच छत्तीसगड गृह लक्ष्मी योजनेंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात थेट 15,000 रुपये दिले जातील.

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबरला होणार आहे. 70 जागांसाठी या निवडणुकीत 953 उमेदवार रिंगणात आहेत. काही दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या जशपूरमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता. (हेही वाचा - Telangana Election 2023: सिंकदराबादमध्ये रॅलीच्या दरम्यान लाइट टॉवरवर चढलेल्या महिलेला पंतप्रधान मोदींनी केली खाली उतरण्याची विनंती)

निवडणूक रॅलीला संबोधित करताना अमित शहा म्हणाले होते की, छत्तीसगडमधील पहिला टप्पा संपला आहे. मी नुकताच रात्री रायपूरमधील सभेतून परतलो आहे. पहिल्या टप्प्यात काँग्रेसचा सफाया झाला आहे. येत्या काही दिवसांत छत्तीसगडमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होणार असल्याची पुष्टी झाली आहे.