Drugs | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

Chennai Drug Raid: चेन्नईच्या पोथेरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील स्थानिक पोलिसांनी केलेल्या गांजा छाप्यात पकडलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हाऊसिंग सोसायटीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. ही घटना मंगळवारी 4 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी एका खासगी शिक्षण संस्थेवर छापा टाकला होता. यावेळी पोलिसांनी 18 विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांकडून पोलिसांनी , सहा गांजा चॉकलेट, गांजा तेल, सहा किलो हुक्का पावडर आणि इतर अनेक नशा सामग्री जप्त केल्या होत्या. हे देखील वाचा: Malad Car Accident: मालाड मध्ये 27 वर्षीय महिलेचा भरधाव गाडीच्या धडकेत मृत्यू

 'गांजा छापा'मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पोलिसांनी विद्यार्थ्यावर कारवाई केल्याने विद्यार्थ्याला त्याच्या पालकांना कॉलेजमध्ये बैठकीसाठी घेऊन येण्याची सूचना करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पालकांच्या रोषाला घाबरून विद्यार्थ्याने त्यांना माहिती दिली नाही. असे न केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, असा इशारा देऊन कॉलेज व्यवस्थापनाने पालकांना सोबत आणण्याचा आग्रह धरला होता. दरम्यान, विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलले.