बहुतेक शहरांमध्ये पेट्रोलचे (Petrol) दर 100 रुपयांच्या पुढे गेले आहे. तसेच अनेक शहरांमध्ये डिझेल (Diesel) 100 रुपयांपेक्षा जास्त दराने विकले जात आहे. मात्र पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींसाठी रविवार चांगला दिवस आहे. कारण रविवारी तेलाच्या (Oil) किमती कमी झाल्या आहेत. तेल कंपन्या सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (Rate) जारी करतात आणि कंपन्यांनी रविवारचे नवीन दरही जाहीर केले आहेत. जर तुम्ही आजची किंमत बघितली तर इंडियन ऑइलच्या (IOC) वेबसाईटनुसार इंधनाचे दर खाली आले आहेत. नवीन दरानुसार, डिझेलच्या किमती 10-20 पैशांनी आणि पेट्रोलच्या जवळपास 10 पैशांनी कमी झाल्या आहेत. शनिवारच्या आधीही तीन दिवस डिझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर राहिल्या. त्याच वेळी, पेट्रोलची किंमत बऱ्याच काळापासून स्थिर होती आणि पेट्रोलच्या किंमतीत शेवटचा बदल 18 जुलै रोजी झाला होता.
आता सुमारे एक महिन्यानंतर पेट्रोलच्या किमतीत बदल झाला आहे. तसेच किंमती खाली आल्या आहेत. आजच्या नवीन दरानुसार राजधानी दिल्लीत शनिवारी पेट्रोल 101.64 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर डिझेल 89.07 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. मुंबईत डिझेल 96.64 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर पेट्रोलची किंमत 107. 66 रुपये प्रति लीटर आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारी कर यामुळे देशातील पेट्रोल-डिझेलचे दर विक्रमी पातळीवर आहेत.
18 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट पर्यंत डिझेलच्या किंमतीत दररोज 20 पैसे प्रति लिटरने घट झाली आहे. यानंतर आज चौथ्यांदा डिझेल 20 पैसे प्रति लीटर स्वस्त झाले आहे. अशा प्रकारे आतापर्यंत डिझेल 80 पैसे प्रति लिटर स्वस्त झाले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. त्या काळात 41 दिवस डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. त्यावेळी डिझेलच्या किंमतीत शेवटची कपात 15 एप्रिल रोजी करण्यात आली होती. त्यावेळी 14 पैशांची कमतरता होती. पण 4 मे पासून त्यात सातत्याने वाढ झाल्यामुळे डिझेल 9.08 प्रति लिटर महाग झाले आहे.