Rahul Gandhi On Caste Census: आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session of Parliament 2025) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर चर्चा होत आहे. संसदेत भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी यांनी आभारप्रदर्शन सादर केले. आता, लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर, काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी अनेक मुद्द्यांवर केंद्र सरकारला घेरले आहे. यावेळी राहुल गांधी यांनी जातीय जनगणना व्हावी, अशी मागणी केली. यासंदर्भात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. बदल फक्त जातीय जनगणनेतूनच येऊ शकतो. देशात सुमारे 55 टक्के ओबीसी आहेत. (हेही वाचा- Rahul Gandhi on Ayodhya incident: अयोध्या घटनेवर राहुल गांधींनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले, 'दलित मुलीवर केलेले अमानुष कृत्य आणि तिची निर्घृण हत्या हृदयद्रावक आणि अतिशय लज्जास्पद')
भाजपमध्ये ओबीसी नेत्यांकडे सत्ता नाही -
राहुल गांधी यांनी लोकसभेत तेलंगणातील जातीय जनगणनेचा उल्लेख केला आणि सांगितले की, तेलंगणातील 90 टक्के लोक एससी-एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक आहेत. देशात ओबीसी लोकसंख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी नाही. तसेच राहुल गांधी यांनी म्हटलं की, भाजपमध्ये ओबीसी नेत्यांची सत्ता नाही. केवळ जातीय जनगणनाचं देशात बदल घडवून आणू शकते. (हेही वाचा -Defamation Case On Rahul Gandhi: मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर)
राहुल गांधी यांची संसदेत जातीय जनगणनेची मागणी -
VIDEO | Parliament Budget session 2025: Lok Sabha LoP Rahul Gandhi (@RahulGandhi) says, "We have done a caste survey in Telangana and what we have found is shocking. Almost 90 per cent of the state is either Dalits, tribals, backward, or minorities, and I am absolutely convinced… pic.twitter.com/W4qMRG0qdS
— Press Trust of India (@PTI_News) February 3, 2025
जीडीपी घसरला - राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधानांनी 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाचा प्रस्ताव मांडला, मला वाटते की तो एक चांगला विचार होता. निकाल तुमच्या समोर आहेत. उत्पादन क्षेत्राचा जीडीपी 2014 मध्ये 15.3% होता, जो आज जीडीपीच्या 12.6% पर्यंत घसरला आहे, जो गेल्या 60 वर्षांतील उत्पादन क्षेत्राचा सर्वात कमी वाटा आहे. मी पंतप्रधानांना दोष देत नाहीये, त्यांनी प्रयत्न केले नाहीत असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मी म्हणू शकतो की पंतप्रधानांनी प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले.