CBI (Photo Credits-Twitter)

Operation Megha Chakra: ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफी (Online Child Pornography) च्या विक्री आणि वितरणाविरूद्ध मोठ्या कारवाईमध्ये, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) शनिवारी 20 राज्यांमधील 56 ठिकाणी छापे टाकले आहेत. उच्च पदस्थ सूत्रांनी आयएएनएसला सांगितले की, सीबीआयला सिंगापूरमधील इंटरपोलच्या क्राइम अगेन्स्ट चिल्ड्रन युनिटकडून इंटरनेटवर अशा सामग्रीची विक्री आणि वितरणाची माहिती मिळाली होती. सीबीआयच्या इंटरपोलच्या क्राइम अगेन्स्ट चिल्ड्रन युनिटने मुंबई, दिल्ली, पटनासह इतर अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे.

त्यानंतर, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींचे संपूर्ण नेटवर्क शोधून काढण्यासाठी 200 हून अधिक सीबीआय अधिकाऱ्यांची विविध पथके तयार करण्यात आली. सीबीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला बाल लैंगिक शोषण सामग्रीच्या वितरणात आरोपी क्लाउड स्टोरेजचा वापर करत असल्याची माहिती मिळाली होती. आम्ही तांत्रिक निरीक्षणाच्या आधारे त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला असून आता आम्ही त्यांचा शोध घेत आहोत. (हेही वाचा - MMS Viral: धक्कादायक! पंजाबनंतर मध्य प्रदेशातील कॉलेजमध्येही एमएमएस प्रकरण, पोलिस तपास सुरु)

सूत्रांनी सांगितले की, ऑनलाइन चाइल्ड पोर्नोग्राफीच्या विक्री आणि वितरणाविरूद्धच्या कारवाईला ऑपरेशन 'मेघा चक्र' असे नाव देण्यात आले आहे. चाइल्ड पॉर्न ऑनलाइन वितरीत करणाऱ्या आरोपींच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने आंतरराष्ट्रीय सहकार्य चॅनेलचे सहकार्य घेतले आहे.