Protests Against CAA: नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात मागील काही दिवसांपासून देशभर आंदोलनं सुरु आहेत. ही आंदोलनं होत असताना काही ठिकाणी हिंसाचाराचे पत्रकारही पाहायला मिळाले. इतकंच नव्हे तर विरोधकांनी मोदी सरकारवर कडाडून टीका देखील केली. दिल्लीत जामिया मिलिया या विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आंदोलन केले पण या आंदोलनाला हिंसाचाराचे रूप मिळाले आणि पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहाण देखील केली. यात आणखी भर म्हणजे CAA ला विरोध केल्यामुळे एका जर्मन विद्यार्थ्याला भारत सोडून जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे.
आयआयटी मद्रासमध्ये भौतिकशास्त्राचे शिक्षण घेणारा जॅकब नावाच्या विद्यार्थ्याने CAA आणि NRC विरोधात आंदालोनामध्ये सहभाग घेतला होता. परंतु, त्यामुळे त्याला आता देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आला आहे.
जॅकब ने इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राशी बोलताना सांगितले की, "परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने मला देश सोडण्यास सांगण्यात आलं आहे. मी गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरुत होतो. एका क्रिडा स्पर्धेत सहभागी होता. तेव्हाच कार्यालयाकडून याबाबतचा मेल मिळाला." भारतातून जर्मनीला परतण्याआधी चेन्नई विमानतळावर असताना जॅकबने ही माहिती दिली आहे.
This German exchange student at IIT Madras has been asked to leave the country for taking part in protests against CAA and NRC. SHAME! pic.twitter.com/cZ4STAVXfy
— Azhar (@lonelyredcurl) December 23, 2019
मुलाखतीत जॅकब म्हणाला की, "मी सोमवारी सकाळी चेन्नईत पोहोचलो तेव्हा माझ्या सहकाऱ्यांनी मला लगेच इमिग्रेशन अधिकाऱ्यांना भेटण्यास सांगितलं. तेव्हा अधिकाऱ्यांनी मला भारतात राहण्यासाठी परवानगी देण्यात काही अडचणी असल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर माझ्या परवानगीला कोणतीही अडचण नसल्याचं लक्षात आलं. परंतु शेवटी CAA आणि त्याविरोधातील आंदोलनातील सहभागाबद्दलही विचारण्यात आलं."
नंतर अधिकाऱ्यांनी जॅकबला सांगितले की त्याने विद्यार्थी व्हिसा नियमांच उल्लंघन केलं असल्याने त्याला तात्काळ भारत सोडावा लागणार आहे