BSF Recruitment 2021: बीएसएफमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती, 10वी आणि 12 वी ऊतीर्ण करू शकतात अर्ज
Border Security Force (BSF) (Photo Credits: Wikimedia Commons)

सैन्यात भरतीचे स्वप्न पाहत आहात. तर आता तुमची प्रतिक्षा संपली आहे. भारतीय सीमा सुरक्षा दलात (BSF)तरुणांसाठी भरती निघाली आहे. भरती एकूण 285 पदांसाठी निघाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2021 आहे. बीएसएफमधील (BSF)अनेक विभागांमध्ये ही भरती निघाली आहे. यात एअरविंग, पॅरामेडिकल स्टाफ, तसेच वेटरीनरी स्टाफ या विभागांचा समावेश आहे. यात उमेदवारांची निवड करण्यासाठी प्रक्रियेत लेखी आणि शारीरिक अशा दोन प्रकारच्या परिक्षा घेतल्या जातील. या दोन चाचण्यांच्या आधारावर भरती केलं जाईल. यासाठी इच्छूक उमेदवारांनी  https://rectt.bsf.gov.in/   या वेबसाईटवर संपर्क साधून अर्ज करू शकता.

कोणत्या पदासाठी निघाली आहे भरती ?

एअरविंग या विभागात एकूण 65 जागांसाठी भरती निघाली आहे. यामध्ये असिस्टंट एअरक्राफ्ट मॅकनिक (ASI) या पदाकरीता एकूण 49 जागा भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी मासिक वेतन 29,200 रूपये ते 92,300 असणार आहे. तर असिस्टंट रेडिओ मॅकेनिक या पदांसाठी 8 जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी वेतन 29,200 रूपयांपासून पुढे असणार आहे. तसेच या विभागातील कॉन्स्टेबल पदासांठीही 8 जागा भरण्यात येणार आहेत. हा पदासाठी 21,700 रुपये ते 69,100 रूपये इतके असेल. वेटरीनरी स्टाफ मध्येही अशा प्रकारची भरती होणार आहे. ज्यात एचसी या पदासाठी 40 जागा तर कॉन्स्टेबल या पदासाठी 30 जागांची भरती होणार आहे.

बीएसएफच्या पॅडामेडिकल विभागात एकूण 153 जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये स्टाफ नर्स या पदासाठी एकूण 77 जागांची भरती होणार आहे. यासाठी महिना वेतन 35400 रुपये ते 1,12,400 रुपयांपर्यंत असू शकते. ऑपरेशन थिएटर टेक्निशियन या पदासाठी 2 जागांची तर लॅब टेक्निशियन पदासाठी 56 जागा भरणार आहे तसेच सीटी या पदासाठीही 18 जागा भरण्यात येणार असल्याचे समजले आहे. या तीनही पदांसाठी वेतन 29200 रुपये ते 92300 रुपये इतके असेल.

भरतीसाठी शिक्षण आणि वयाची अट

एअरविंग विभागामध्ये भरतीसाठी उमेदवाराकडे 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स करणे गरजेचे आहे. किंवा एअरफोर्स X चे प्रमाणपत्र असावे. या पदाकरीता 28 वर्षापर्यंतचे उमेदवार अर्जास पात्र ठरतील. तसेच इतर दोन्ही विभागातील पदासाठी 12वी उतीर्ण किंवा एका संबंधित विषयातील डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला असणं गरजेचं आहे. यासाठीही वयोमर्यादा 28 वर्षे इतकी आहे. तसेच कॉन्स्टेबल या पदासाठी 10वी आणि कोणत्याही सरकारी संस्थेत दोन वर्ष कामाचा अनुभव असायला हवा. यामध्ये वयवर्ष 20 ते 25 या गटातील उमेदवार पात्र ठरतील.