भाजप नेत्या आशा सिंह यांचा रस्ता अपघातात दुर्देवी मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) नेत्या आशा सिंह यांचा रस्ता अपघातात (Road Accident) दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना चंदोसी-अलिगडमार्गावर (Chandausi Aligarh Road) घडली असून भाजपच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आशा सिंह यांच्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही अपघात घडल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक लोकांनी आशा सिंह आणि त्यांच्या वाहनचालकाला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, आशा सिंह यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी त्यावेळी सांगितले. काहीवेळाने आशा सिंह यांच्या चालकानेही उपचार दरम्यान अखेरचा श्वास घेतला.

आशा सिंह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्य होत्या. रविवारी आशा सिंह त्यांच्या खाजगी कामासाठी घराबाहेर पडल्या होत्या. त्यावेळी त्याच्या वाहनचालकही त्याच्यासोबत होता. चंदोसी- अलिगड या रस्त्यावर आल्यानंतर आशा सिंह यांच्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांचे वाहन रस्त्यालगतच्या झाडाला धडकले. घटनास्थळी असलेल्या स्थानिक लोकांनी आशा सिंह आणि त्यांच्या वाहन चालकाला जवळील रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. रुग्णलयात गेल्यानंतर आशा सिहं यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच काही वेळानंतर वाहन चालकाची मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- TN Seshan Passed Away: माजी निवडणूक मुख्य आयुक्त टी.एन. शेषन यांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन

भाजपमध्ये सामील होण्याअगोदर आशा सिंह समाजवादी पक्षात सक्रीय होत्या. आशा सिंह यांना समाजवादी पक्षाकडून महानगरपालिका 2012 निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, निवडणुकीच्या तीन दिवस अगोदर त्यांची उमेदवारी काढून घेतली होती. समाजवादी पक्षात समील होण्याअगोदर 2007 ते 2009 सालापर्यंत त्या बहुजन समाजवादी पक्षात होत्या. सध्या उत्तर प्रदेश येथे भाजपच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून सक्रीय आहेत.