त्रिपुरामध्ये भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या; राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप
Representational Image (File Photo)

त्रिपुरात भाजपचे सत्ताधारी नेते कृपा रंजन चकमा यांची शनिवारी काही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, दोन-तीन सशस्त्र हल्लेखोरांनी पहाटेच्या सुमारास ढलाई जिल्ह्यातील माणिकपूर येथील आदिवासी नेत्यांच्या घरावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. मारेकऱ्यांवर छापा टाकण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात सख्त मोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणातील एका स्थानिक संशयितास ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

त्रिपुरा आदिवासी क्षेत्र स्वायत्त जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने या घटनेला राजकीय षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. भाजप प्रवक्ते नवेन्दु भट्टाचार्य यांनी सांगितले की, कृपा चकमा हे आदिवासींच्या कल्याण आणि विकासासाठी समर्पित कार्यकर्ते होते. त्यांनी चकमाच्या हत्येला धक्कादायक म्हटले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून ते राजकारणात सक्रिय होते. (वाचा - Student Suicide: दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या; सुरतमधील धक्कादायक प्रकार)

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपूर्वी अमेठीच्या संग्रामपूर कोतवाली भागात युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. घराचा सुमारे सातशे मीटर अंतरावर कालव्याच्या ट्रॅकवर तरूणाचा मृतदेह आढळला. बृजेश सिंग असं या युवकाचं नाव आहे. बृजेश हा संग्रामपूरमधील भुलाई या गावी राहत होता. त्याच्या मृत्यूनंतर गावात एकच खळबळ उडाली. बृजेश हे गावात प्रमुखपदासाठी निवडणूक लढविणार होते.

मारेकऱ्यांच्या अटकेची मागणी करत कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. पोलिस अधीक्षक दिनेश सिंह यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.