Dilip Ghosh, Supriya Shrinate: महिलांवरील आक्षेपार्ह टीका भोवली, भाजप खासदार दिलीप  घोष, काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत ठरल्या दोषी; निवडणूक आयोगानं दिले 'हे' आदेश

भाजपच्या मंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार व अभिनेत्री कंगना राणौत यांच्याविरोधात काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांच्या एक्स हॅण्डलवरून करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत (Congress Supriya Shrinate) अडचणीत आल्या आहेत, तर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिलीप घोष ((BJP Dilip Ghosh) यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची वैयक्तिकरीत्या खिल्ली उडवने महागात पडले आहे.  निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी दिलीप घोष आणि सुप्रिया श्रीनेत हे दोषी ठरले आहेत. निवडणूक आयोगानं (Election Commission) त्यांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर हा निकाल दिला असून आपल्या आदेशात त्यांना महत्वाचे निर्देश दिले आहेत.

पाहा पोस्ट -

महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल भारतीय निवडणूक आयोगानं भाजप खासदार दिलीप घोष आणि काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची निंदा केली आहे. आयोगानं म्हटलं की, आचारसंहिता उल्लंघनाबाबत या दोघांना बजावलेल्या नोटिसांचं उत्तर मिळाल्यानंतर आपला आदेश जाहीर केले. प्रचारादरम्यान वैयक्तिकरित्या हल्ला केला असून ही कृती आदर्श आचारसंहितेच्या तरतुदींचं उल्लंघन आहे, याची त्यांना खात्री आहे. त्यांना आदर्श आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक भाषण करताना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळेपासून आयोगाकडून त्यांच्या निवडणुकीशी संबंधित संवादांवर विशेष लक्ष ठेवल जाईल, असंही आयोगानं म्हटलं आहे. तसेच  प्रचारादरम्यान वैयक्तिकरित्या हल्ला करण्याचे टाळण्याचे देखील म्हटले आहे.