Delhi Assembly Elections 2020: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर, अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी
Arvind Kejriwal VS Sunil Yadav's (PC - PTI and Twitter)

Delhi Assembly Elections 2020: दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज दुसरी यादी जाहीर झाली आहे. भाजपने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind kejriwal) यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव (Sunil Yadav) यांना उमेदवारी दिली आहे.

तसेच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्याविरोधात भाजपने पटपडगंज मतदारसंघामधून रवी नेगी यांना उमेदवारी दिली आहे. दिल्लीमध्ये 8 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार असून 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. 70 सदस्यीय दिल्ली विधानसभेची मुदत 22 फेब्रुवारी रोजी संपणार आहे. त्याआधी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं अपेक्षित आहे. (हेही वाचा - दिल्ली विधानसभा निवडणूकीसाठी नरेंद्र मोदी यांना शिवाजी महाराज तर अमित शाह यांना तान्हाजी रूपात दाखवणारा Video Viral; नेटकरी भडकले!)

याअगोदर भाजपने 70 पैकी 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज भाजपने 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दिल्लीत सध्या भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्या युतीची शक्यता अत्यंत कमी आहे. सध्या दिल्लीमध्ये सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. तसेच उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे.