बिहार: डॉक्टरांचा कहर! मुलाच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर, पण उजव्या हाताला केले प्लास्टर
हाताला दुखापत (फोटो सौजन्य-ANI)

बिहार (Bihar) येथील एका प्रसिद्ध सरकारी रुग्णालयात डॉक्टरांनी कहर केला आहे. रुग्णालयात एक मुलगा त्याच्या हाताल दुखापत झाल्याने उपचारासाठी आला होता.मात्र त्याच्या ज्या हाताला दुखापत झाली आहे त्या हाताला डॉक्टरांनी उपचार न करता दुसऱ्याच हातावर उपचार केले आहेत.

फैझान असे मुलाचे नाव आहे. फैझान हा झाडावरुन खाली पडल्याने त्याच्या डाव्या हाताचे हाड तुटले होते. त्यामुळे उपचारासाठी दरभंगामधील प्रसिद्ध सरकारी रुग्णालयात दाखल झाला. तर डॉक्टरांनी ज्या हाताचे हाड तुटले आहे तेथे प्लास्टर करण्याऐवजी उजव्या हाताला प्लास्टर करुन दिले. मात्र फैझान याने डॉक्टरला तुम्ही चुकीच्या हाताला प्लास्टर केले आहे असे वारंवार सांगितले. परंतु डॉक्टरांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तर धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीवरसुद्धा फैझलचा डाव्या हाताचे हाड तुटल्याचे म्हटले होते.(सर्वात Healthy राज्यांमध्ये केरळने मारली बाजी, युपी शेवटच्या स्थानी; महाराष्ट्राचा 3 रा नंबर (संपूर्ण यादी)

या प्रकारामुळे फैझलच्या घरातील मंडळींनी संताप व्यक्त केला. तसेच रुग्णालयाच्या अधिक्षकांकडे तक्रार केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांची चूक कबुल केली. त्याचसोबत संबंधित प्रकरणातील व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.