बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी पॉर्न साइट्ससंबधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली 'ही' मागणी
Chief Minister Nitish Kumar (PC -Facebook)

देशात अलिकडे काही दिवसांत महिलांवरील बलात्कारांचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे राजकीय नेते सरकारवर टीका करताना पाहायला मिळत आहेत. हैदराबाद येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या बलात्कारांमुळे संपूर्ण देशातील वातावरण ढवळून निघाले. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Chief Minister Nitish Kumar) यांनी या घटनेवर काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती. पॉर्न साइट्समुळे बलात्काराच्या घटना वाढत असून या साइट्सवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नितीश कुमार यांनी एका कार्यक्रमात केली होती. आता नितिश कुमार यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी इंटरनेटवरील पॉर्न साइट्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. (हेही वाचा - पॉर्न साइटमुळे बलात्काराच्या घटना वाढत आहेत - मुख्यमंत्री नितीश कुमार)

हैदराबाद, उन्नाव तसेच कठूआ येथे महिलांवर झालेल्या बलात्काराच्या घटना अत्यंत वाईट आहेत. देशातील सर्वच राज्यात बलात्काराच्या घटना घडत आहेत. ही बाब चिंताजनक आहे. तरुण मुले इंटरनेटवर अश्लील व्हिडिओ पाहतात. हे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर शेअर केले जातात. याचा अल्पवयीन मुलांवर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या इंटरनेट साइट्वर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कायद्यामध्ये काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. मात्र, या तरतुदीची अंमलबजावणी होत नसल्याचंही नितिश कुमार यांनी पत्रात नमूद केलं आहे.

हेही वाचा - बलात्कार करणाऱ्या दोषीला जगातील 'या' देशात आहेत कठोर शिक्षा; पाहा काय आहे शिक्षेचं स्वरूप

महिलांवरील बलात्कार थांबवण्यासाठी पॉर्न साइट्स संदर्भातील सूचनांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच शाळा, कॉलेज आणि पालक यांना यासंदर्भात जागरू करण्यासाठी मोहिम राबवणे आवश्यक असल्याचेही नितीश कुमार यांनी पत्रात म्हटले आहे.