बिहारमध्ये (Bihar) मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या रिक्षाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 7 प्रवासी गंभीर जखमी झाले. ही घटना बिहारमधील लखीसराय (Lakhisarai) जिल्ह्यात मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. (हेही वाचा - Gujarat Road Accident: बनासकांठामध्ये लोखंडी रॉडने भरलेल्या रिक्षाला बसची धडक, आठ जण जखमी (Watch Video))
पाहा पोस्ट -
Lakhisarai Road Accident: Nine Killed, Six Others Injured After Autorickshaw Hit by Unidentified Vehicle in Bihar (Watch Video) @News18Bihar #Lakhisarai #Bihar #Accident https://t.co/1cz2VXZm1W
— LatestLY (@latestly) February 21, 2024
अपघातग्रस्त रिक्षामधून 15 प्रवासी प्रवास करीत होते. मंगळवारी रात्री लखीसराय-सिकंदरा मुख्य रस्त्यावरील बिहारौरा गावाजवळ रिक्षा आली असता, अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बचावकार्य केले. सध्या मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.
सध्या मोबाईल क्रमांकाच्या आधारे त्याच्या कुटुंबीयांना माहिती देऊन त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, काही जखमींची ओळख पटली आहे. रिक्षाला नेमकी कोणत्या वाहनाने धडक दिली. याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. या अज्ञात वाहनाने रिक्षाला धडक दिल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला.