Bengaluru Shocker: कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे पती-पत्नीच्या भांडणात पत्नीने कात्रीने वार करून पतीला जखमी केले आहे. प्रकरण असे की, 26 जून रोजी नलिनी नावाची महिला तिच्या माहेरून आली होती. माहेरून आणलेले जेवण तिने पती सुरेशला खायला सांगितले. पण पतीने जेवायला नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने तुला फक्त तुझ्या आईने बनवलेले जेवण आवडते, असे म्हणत घरात पडलेल्या कात्रीने पतीवर हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी त्याला घराबाहेर पळून सासरच्यांचा आसरा घ्यावा लागला. पत्नीच्या हल्ल्यामुळे तरुणाच्या हाताला पाठीसह अनेक ठिकाणी जखमा झाल्या. पत्नीच्या हल्ल्यानंतर सासू-सासरेही आपल्या मुलीची चूक मानायला तयार नव्हते. त्यामुळे या तरुणाने घटनेच्या दोन दिवसांनी स्थानिक पोलीस ठाणे गाठले. जिथे त्याने पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुरुषाच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेविरुद्ध आयपीसी कलम ३२४ (धोकादायक शस्त्राने हल्ला), ५०४ (शांतता भंग करण्याच्या हेतूने जाणूनबुजून अपमान) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पतीने गुन्हा दाखल केल्यानंतर पत्नीनेही पोलिसात धाव घेतली. तिने पतीविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते, जिथे दोघांनी एकमेकांवर आरोप केले. समुपदेशनानंतर दोघांनाही शांत करून घरी पाठवण्यात आले.
2021 मध्ये दोघांनी केले होते लग्न:
सुरेश आणि नलिनी यांचे २०२१ मध्ये लग्न झाले. नलिनी एका मैत्रिणीमार्फत सुरेशला भेटली. दोघांनी एकमेकांना पसंती दिल्याने भेटीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले. लग्नानंतर हे जोडपे बेंगळुरूच्या बनशंकरी येथे राहू लागले. त्यांच्या पत्नीचे माहेरचे घरही त्यांच्या घराजवळील इमारतीत राहतात. सुरेश हा तामिळनाडूचा रहिवासी आहे. पण लग्नाआधीच बेंगळुरूमध्ये राहतो.