Uttar Pradesh Shocker: उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी गुंड-राजकारणी अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अश्रफ (Ashraf Ahmad) याची ऑन कॅमेरा हत्या करण्यात आली. त्यानंतर लगेचचं दोन दिवसांनी उत्तर प्रदेशात आणखी एक धक्कादायक गुन्हेगारी घटना घडली आहे. जालौनमध्ये परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या BA च्या विद्यार्थ्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घटनेनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने आरोपीने खून केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त, पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
रोशनी अहिरवार (वय, 20 वर्ष) असं गोळी झाडलेल्या विद्यार्थिनीचं नाव आहे. ती ऐंधा गावची रहिवासी असून राम लखन पटेल कॉलेजमध्ये बीएच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती. आज कॉलेजमध्ये परीक्षा देऊन ती घरी परतत होती. तेवढ्यात कोत्रा तिराहे येथे मागून पल्सर दुचाकीवर दोन तरुण आले. काहीही न बोलता मागे बसलेल्या तरुणाने विद्यार्थिनीच्या डोक्यात गोळी झाडली. घटनेनंतर आरोपींनी पिस्तुल फेकून पळ काढला. घटनास्थळापासून कोतवाली ET फक्त 200 मीटर अंतरावर आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तपास सुरू आहे. (हेही वाचा - Atiq And Ashraf Murder: अतिक आणि अश्रफ यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनाही धोका? तिन्ही मारेकऱ्यांना नैनी कारागृहातून प्रतापगडला हलवण्यात आलं)
कॉलेजच्या ड्रेसमध्ये रस्त्यावर पडलेली रक्ताने माखलेली विद्यार्थिनी आपले शेवटचे श्वास मोजत होती. तिला तत्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र याच दरम्यान तिचा मृत्यू झाला. विद्यार्थिनीची भरदिवसा का केली हत्या? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थानिक पोलिसांव्यतिरिक्त एसपी डॉ. इराज राजा यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची पाहणी केली.
उत्तर प्रदेश के जालौन में बाइक सवार दो युवकों ने दिन दहाड़े एक छात्रा की गोली मारकर हत्या कर दी ।
गोदी मीडिया के भेड़िए और भाजपाई क्या इस मौत को भी सेलिब्रेट करेंगे?
— Rashtriya Janata Dal (@RJDforIndia) April 17, 2023
दरम्यान, या घटनेबाबत अखिलेश यादव यांनी योगी सरकारला घेरले आहे. घटनेचा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, भाजप सरकार ~ फक्त-गुन्हा-गुन्हा. पोलिस विद्यार्थ्याच्या मोबाईलचा सीडीआर काढत आहेत. या घटनेचा गांभीर्याने तपास करण्यात येत असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. इराज राजा यांनी सांगितले. पोलिस ठाण्याव्यतिरिक्त एसओजीही तपासात गुंतले आहे. लवकरच मारेकऱ्याची ओळख पटवून अटक करण्यात येईल, असं पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.