Bank Loan Offers: बँकेकडून लोन घ्यायचा विचार करताय, तर 'या' दोन बँका देतायत आकर्षक ऑफर्स
Home | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

जर तुम्ही होम लोन (Home Loan) घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला परवडणाऱ्या दरात कर्ज घेण्याची उत्तम संधी आहे. पंजाब नॅशनल बँकेने (PNB) स्वातंत्र्य दिनाच्या निमीत्ताने गृहकर्जाच्या ऑफर दिल्या आहेत. 30 सप्टेंबरपर्यंत या ऑफरचा लाभ घेता येईल. पीएनबीच्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) गृहकर्जाच्या ऑफर अंतर्गत ग्राहकांकडून कोणतेही प्रक्रिया शुल्क आकारणार नाहीत. म्हणजेच गृहकर्ज कोणत्याही प्रक्रिया शुल्क आणि दस्तऐवजीकरण शुल्काशिवाय उपलब्ध असेल. पीएनबी ग्राहकांना 6.80 टक्के दराने गृहकर्ज देत आहे. म्हणजेच PNB कडून गृहकर्ज घेणाऱ्यांना कमी दरात गृहकर्ज मिळेल. तसेच दोन्ही शुल्कही माफ केले जातील. पीएनबीने याबद्दल ट्विट (Tweet) केले आहे.  पीएनबी सुवर्ण कमाईची संधी देखील देत आहे. आपल्याकडे निष्क्रिय पडलेले सोन्याचे दागिने, आपण त्याच्या मदतीने कमावू शकता.

सुवर्ण मुद्रीकरण योजने अंतर्गत किमान 10 ग्रॅम सोने जमा करता येते. बँक ठेवीसाठी तीन पर्याय देत आहे. अल्प मुदतीच्या ठेवी 1-3 वर्षांच्या असतील. मध्यम मुदतीच्या ठेवी 5-7 वर्षांच्या असतील आणि दीर्घ मुदतीच्या ठेवी 12-15 वर्षांच्या असतील. अल्प मुदतीच्या ठेवींमध्ये 1 वर्षासाठी 0.50 टक्के, 1-2 वर्षांसाठी 0.60 टक्के आणि 2-3 वर्षांसाठी 0.75 टक्के व्याज उपलब्ध असेल. मध्यम मुदत ठेवींसाठी व्याज दर 2.25%आहे, तर दीर्घ मुदतीच्या ठेवींसाठी हा व्याज दर 2.50 टक्के आहे.

एसबीआयने (SBI) यापूर्वी किरकोळ ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या ऑफर आणल्या होत्या.  एसबीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, ते आपल्या ऑटो लोन ग्राहकांकडून प्रोसेसिंग फी आकारणार नाही आणि कार कर्जासाठी ऑन रोड 90 टक्के अर्थसहाय्य देखील करेल. एवढेच नाही तर जे ग्राहक बँकेच्या YONO अॅपद्वारे कार कर्जासाठी अर्ज करतात त्यांना व्याजदरांमध्ये 25 बेसिस पॉइंटची विशेष सवलत देखील मिळेल.  एसबीआयचे म्हणणे आहे की YONO वापरकर्त्यांना 7.5% व्याज दराने कार कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. हेही वाचा PM Narendra Modi Temple: पुणे येथील मंदिरातून नरेंद्र मोदी यांची मूर्ती गायब, थेट पीएमओ कार्यालतातून आदेश आल्याची चर्चा

याशिवाय, ज्या ग्राहकांना सुवर्ण कर्ज घ्यायचे आहे, त्यांना 7.5% व्याज दराने 75 बेसिस पॉईंट्स (0.75%) सूट मिळेल. ग्राहकांनी YONO अॅपद्वारे सुवर्ण कर्जासाठी अर्ज केल्यास त्यांच्यासाठी प्रक्रिया शुल्क देखील माफ केले जाईल. एसबीआय आपल्या ग्राहकांना गृहकर्जावरील प्रक्रिया शुल्कापासूनही दिलासा देत आहे. बँकेने जाहीर केले आहे की त्याच्या गृहकर्ज ग्राहकांना 31 ऑगस्ट 2021 पर्यंत प्रक्रिया शुल्क भरावे लागणार नाही, एसबीआयचे गृहकर्जाचे व्याज दर 6.7% वार्षिक पासून सुरू होतात.