Alcohol (Photo Credit -pixabay)

Assam Women Rank Highest In Alcohol Consumption: असम राज्यातील महिला भारतात दारू पिण्याच्या बाबतीत इतर राज्यांपेक्षा अग्रेसर आहेत. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे. असममध्ये 15 ते 49 वर्षे वयोगटातील 26.3 टक्के महिला मद्यपान करतात. 2019-20 साठी उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, मद्यपान करण्याच्या बाबतीत असममधील महिलांचे प्रमाण सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांपेक्षा सर्वाधिक आहे. असम राज्यानंतर जम्मू-काश्मीरचा नंबर लागतो. जम्मू-काश्मीरमध्ये 15-49 या वयोगटातील 23 टक्के महिला मद्यपान करतात. याशिवाय नागालँड, हिमाचल प्रदेश, गोवा आणि कर्नाटक राज्यातील महिलांचे मद्यपान करण्याचे प्रमाण आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवर, केवळ 1.2% महिला मद्यपान करतात.

चंदीगड, लक्षद्वीपमध्ये दारू पिणाऱ्या महिलांची संख्या शून्य नमूद करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, मेघालयातील 8.7% महिला मद्यपान करतात. इतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या 10% पेक्षा कमी आहे. अहवालानुसार, असममधील 44.8% स्त्रिया आठवड्यातून एकदा मद्यपान करतात. राष्ट्रीय स्तरावर हे प्रमाण 35% आहे. (हेही वाचा - Inter-Caste Marriages: आंतरजातीय विवाहासाठी ओडिशा सरकारने लॉन्च केले वेब पोर्टल, प्रोत्साहन निधी 2.5 लाखांनी वाढवला)

पुरुष मद्यपींच्या बाबतीत अरुणाचल प्रदेश पहिल्या क्रमांकारवर -

अरुणाचल प्रदेशातील पुरुष भारतात सर्वाधिक मद्यपान करतात. त्यामुळे पुरुष मद्यपींच्या बाबतीत अरुणाचल प्रदेश पहिल्या क्रमांकारवर आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये दारू पिणाऱ्या पुरुषांचे प्रमाण 59% आहे. तसेच हे प्रमाण राष्ट्रीय पातळीवर 29.2% आहे. आसाममध्ये हा आकडा 29.2% इतका आहे. अरुणाचल प्रदेशमध्ये 51.9% पुरुष आठवड्यातून एकदा मद्यपान करतात. तर हेच राष्ट्रीय प्रमाण 40.7% आहे. (वाचा - Ban on International Flights Extended: आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांवरील निर्बंध 30 नोव्हेंबर पर्यंत कायम- DGCA)

पश्चिम बंगालमध्ये तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक -

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पुरुष आणि स्त्रिया दोघेही राष्ट्रीय स्तरावर तंबाखूच्या सेवेत अग्रेसर आहेत. पश्चिम बंगालमधील 80.4 टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात. तसेच 59.2 टक्के महिला तंबाखूचे सेवन करतात. तेलंगणात 70 टक्के पुरुष तंबाखूचे सेवन करतात. तर हेच प्रमाण महिलांच्या बाबतीत 48.8 टक्के इतक आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, आसाम आणि बिहारमध्ये 60% पेक्षा जास्त पुरुष तंबाखूचे सेवन करतात. वरील सर्व आकडेवारी आरोग्या मंत्रालयाच्या सर्वेक्षणात समोर आली आहे.