Army Officer Killed in Doda Encounter: उद्या देशभरात स्वातंत्र्यदिन साजरी होणार आहे. मात्र, भारताच्या सीमेवर जम्मू काश्मीरच्या डोडा इथल्या पटनीटॉपच्या जंगलात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक(Terrorist Attack) सुरू आहे. एक दहशतवादी जखमी अवस्थेत सैन्याच्या हाती आला आहे. गेल्या पाच दिवसात ही चौथी चकमक आहे. लष्कराकडून याबाबत माहिती देण्यात आलीय. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत. डोडा परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध सुरक्षादलांकडून घेतला जात आहे. (हेही वाचा: Jammu and Kashmir: जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; एक दहशतवादी जखमी, एम 4 रायफल जप्त)
किश्तवाड जिल्ह्याच्या जंगलात दहशतवादी आणि सुरक्षादलात ११ ऑगस्टलासुद्धा गोळीबार झाला होता. त्याच दिवशी उधमपूरच्या बसंतगढच्या जंगलात लष्कर आणि सुरक्षादलात गोळीबार झाला होता. तर १० ऑगस्टला अनंतनागच्या कोकरनागच्या जंगलात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दीपक कुमार यादव आणि लान्स नायक प्रवीण शर्मा शहीद झाले होते. याशिवाय ३ जवान आणि २ नागरिक जखमी झाले होते.
दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय लष्कराच्या ४८ राष्ट्रीय रायफलचे कॅप्टन दीपक सिंग या चकमकीत शहीद झाले आहेत. डोडा इथं या घटनेनंतर शोध मोहिम सुरू आहे. भारताकडून राबवण्यात येत असलेल्या दहशतवाद्यांच्या सर्च ऑपरेशननंतर दहशतवाद्यांनी तेथेच शस्त्रे टाकून पळ काढला. अमेरिकन एम ४ रायफल जप्त करण्यात आली. तीन बॅग्जमध्ये काही स्फोटके आढळली आहेत. दहशतवादी अकर क्षेत्रात एका नदीजवळ लपले होते.