Coronavirus Oral Drug: कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तयार करण्यात आलेली ओरल ड्रग उंदरावर ठरली परिणामकारक; मानवी चाचणी अंतिम टप्प्यात
Rat (PC -Pixabay)

Coronavirus Oral Drug: कोरोना विषाणूविरूद्ध ओरल ड्रग (Oral Drug) उंदरांवर (Rat) प्रभावी असल्याचे आढळले आहे. या औषधाची मानवावर अंतिम टप्प्यात चाचणी घेण्यात येत आहे. हे औषध इन्फ्लूएन्झाच्या उपचारांसाठी विकसित केले गेले आहे. यासंदर्भात संशोधकांनी माहिती दिली आहे. उंदराच्या हॅमस्टर नावाच्या एक प्रजातीवरील या औषधाची चाचणी घेण्यात आली. या संशोधनात असं आढळून आलं की, हे औषध कोरोना व्हायरसपासून फुफ्फुसांचे नुकसान कमी करण्यासदेखील मदत करते.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (एनआयएच) आणि यूके युनिव्हर्सिटी ऑफ प्लाइमाउथ येथील शास्त्रज्ञांना असे आढळले आहे की, सीओव्ही -2 संसर्गाच्या 12 तास आधी किंवा 12 तासांनंतर एमके-4482 औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी आहे. मोलनुपीरवीर असं या औषधाचं नाव आहे. (वाचा - Coronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा)

या अभ्यासाचा अहवाल 16 एप्रिल रोजी नेचर कम्युनिकेशन या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. अहवालानुसार, अँटीव्हायरल औषध एमके-4482 कोरोना विषाणूच्या संसर्गाची जोखीम कमी करू शकते आणि आधीच संक्रमित रूग्णांच्या उपचारांमध्ये एकट्या किंवा इतर औषधांसह देखील प्रभावी असू शकते. संशोधकांच्या म्हणण्यानुसार कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी कोणतेही प्रभावी औषध नाही.

दरम्यान, प्लाइमाउथ विद्यापीठातील विषाणूशास्त्र आणि रोगप्रतिकार विभागातील सहयोगी प्राध्यापक आणि एनआयएचचे अतिथी संशोधक मायकेल जार्विस यांनी सांगितले की सार्स-सीओव्ही -2 विरूद्ध लस व्यतिरिक्त आमच्याकडे या विषाणूविरूद्ध प्रभावी औषध नाही. एमके-4482 चे निकाल उत्साहवर्धक आहेत आणि सार्स-सीओव्ही -2 विरूद्ध अतिरिक्त औषध असू शकते.

जुबिलेंट फार्मोवा यांनी सोमवारी सांगितले की त्याच्या सहयोगी युनिट जुबिलंट फार्मा यांनी अँटिव्हायरल इंजेक्शन रीमाडेसिविरच्या तोंडी औषधाची कोरोना रूग्णांच्या उपचारांमध्ये यशस्वी चाचणी पूर्ण केली आहे. ही चाचणी प्राणी आणि निरोगी लोकांवर केली गेली आहे. या औषधाच्या पुढील अभ्यासासाठी कंपनीने भारतीय औषध नियंत्रक (डीसीजीआय) कडून परवानगी मागितली आहे.