Amarnath Yatra 2022: 'या' दिवसापासून सुरू होणार अमरनाथ यात्रा, जाणून घ्या काय असतील मार्गदर्शक तत्त्वे
Amarnath Yatra (Photo Credit: Twitter)

अमरनाथ यात्रा 2022 च्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. या वर्षी अमरनाथ यात्रा 30 जून 2022 (Amarnath Yatra 2022) पासून सुरू होणार आहे. जम्मू-काश्मीरच्या (Jammu-Kashmir) नायब राज्यपालांच्या कार्यालयाने रविवारी ही माहिती दिली. लेफ्टनंट गव्हर्नर कार्यालयाने सांगितले की, जूनपासून सुरू होणारी यात्रा कोविड प्रोटोकॉलद्वारे (Amarnath Yatra Covid Guidelines)  बंधनकारक असणार आहे. अमरनाथ यात्रा 43 दिवस चालणार असून त्यातील शेवटचा दिवस रक्षाबंधनाचा असेल. कोरोना महामारीमुळे दोन वर्षांपासून बंद असलेली अमरनाथ यात्रा 30 जूनपासून सुरू होणार आहे. श्राइन बोर्डाच्या म्हणण्यानुसार, अमरनाथ यात्रेला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांची नोंदणी प्रक्रिया 2 एप्रिलपासून सुरू होणार आहे. एका दिवसात केवळ 20 हजार लोकांची नोंदणी होणार असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. याशिवाय प्रवासाच्या दिवसांत काउंटरवर जाऊनही नोंदणी करता येते.

फिटनेस प्रमाणपत्र असणे आवश्यक

अमरनाथ यात्रेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या प्रवासाला फक्त तेच भाविक जाऊ शकतील, ज्यांचे वय 16 ते 65 वर्षांच्या दरम्यान असेल. अमरनाथ यात्रा 20222 साठी वैद्यकीय प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. यासोबतच प्रवाशांना प्रवासासाठी फिटनेस प्रमाणपत्रही आवश्यक असणार आहे. (हे देखील वाचा: Good News! मोदी सरकारने PM Garib Kalyan Yojana ची मुदत सहा महिने वाढवली; आता 30 सप्टेंबर 2022 पर्यंत गरिबांना मिळणार मोफत रेशन)

अमरनाथ यात्रा ही सर्व धार्मिक तीर्थक्षेत्रांपैकी एक सर्वात कठीण यात्रा आहे. अमरनाथ यात्रेची चढण दोन मार्गांनी जाते. पहिला मार्ग पहलगाममधून जातो तर दुसरा मार्ग बलदालमधून जातो. हे दोन्ही मार्ग नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असतात, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रवासापूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर सुरक्षा दल तैनात असते.