Lockdown: भारत सरकारच्या निर्देशानंतरच देशांतर्गत विमानसेवा सुरु केली जाणार; एअर इंडियाची माहिती
Air India | Representational Image | (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोना विषाणूने संपूर्ण देशातील नागरिकांना हादरून सोडले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता देशात 31 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) घोषीत करण्यात आला आहे. देशात गेल्या 54 दिवसांपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद ठेवण्यात आले आहे. यातच एअर इंडिया (Air India) आता देशांतर्गत विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर एअर इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे. सध्या एअर इंडियाच्या विमानाची बुकींग बंद आहे. तसेच भारत सरकारच्या निर्देशानंतरच देशांतर्गत विमानसेवा सुरु केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे. लॉकडाउन मध्ये विविध शहरात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ राज्यात घेऊन जाण्याकरिता एअर इंडिया 19 मे ते 2 जूनपर्यंत देशांतर्गत विमानसेवा सुरु करणार असल्याची बातमी सर्वत्र झळकत होती.

देशांतर्गत उड्डाणे सुरू करण्यासाठी एअरलाइन्सच्या वतीने डीजीसीए आणि एमओसीएला विमानाच्या परिचालन संदर्भातील एअरवॉर्थिनेस रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. वृत्तानुसार, अहवालात एअरलाइन्सकडून असे सांगितले गेले आहे की, त्यांचे विमान उड्डाण करण्यास तयार आहेत. तसेच विमांनाना देशांर्तगत उड्डाण करण्याची परवानगी मिळू शकते, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हे देखील वाचा- वाहनांवर Fastag असूनही जर त्यामध्ये आढळल्या 'या' त्रुटी तर भरावा लागणार दुप्पट दंड

ट्वीट-

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगाला हादरून सोडले आहे. भारतातही कोरोना विषाणूचे जाळे आता संपूर्ण देशात पसरत चालले आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण देशात 31 मे पर्यंत लॉकडाउन घोषीत करण्यात आला आहे. सध्या भारतात एकूण 90 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 2 हजार 872 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, आतापर्यंत 34 हजार 109 जण कोरोनामुक्त झाले आहेत.