Shocking! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीसह तिच्या 6 मैत्रिणींनी केलं विष प्राशन; तिघींचा मृत्यू, नेमकी काय आहे प्रकरण? जाणून घ्या
Death (Photo Credits-Facebook)

बिहारच्या औरंगाबाद (Aurangabad) मधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसी आणि तिच्या मैत्रिणींनी विष (Poison) प्राशन केले. यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला असून तिघींची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना कसमा पोलीस स्टेशन हद्दीतील चिरैला गावातील आहे.

एकाच वेळी सहा मुलींनी विष प्राशन केल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. या घटनेचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून प्रेमप्रकरणातून मुलींनी असे भयंकर पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच रफीगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. (हेही वाचा - Shocking! आसाराम बापूच्या आश्रमातील कारमध्ये आढळला बेपत्ता झालेल्या युवतीचा मृतदेह; तपास सुरु)

पोलिसांनी सांगितले की, 6 मुलींनी विष (Poison) प्राशन केले होते. त्यापैकी तिघींचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित तिघींवर मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही मैत्रिणीची प्रकृती चिंताजनक आहे. दुसरीकडे, मृत्यू झालेल्या मुलींपैकी एका मुलीचे तिच्या भावाच्या मेव्हण्यावर प्रेम होते, अशी चर्चा गावात आहे. तिने तिच्या मैत्रिणींसोबत मुलासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, जो त्याने नाकारला.

प्रियकराने नकार दिल्याने तरुणीने विष प्राशन केले. हे पाहून तिच्या बाकीच्या मैत्रिणींनीही विष प्राशन केलं. त्यांनी विषारी पदार्थांचे सेवनही केले. लोकांना या घटनेची माहिती मिळताच सर्वांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, विष प्राशन केलेल्या तीन मुलींचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या सदर रुग्णालयात आणण्यात आले आहेत.