Odisha Train Accident: बालासोर रेल्वे दुर्घटनेत आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय येथील बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर रुळांच्या दुरुस्तीचे काम जोरात सुरू आहे. आतापर्यंत हावडा-चेन्नई मार्गावरील 90 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर 46 गाड्या पुन्हा मार्गस्थ करण्यात आल्या आहेत. अधिकृत माहितीनुसार, सोमवारपर्यंत ट्रॅकची दुरुस्ती होणे अपेक्षित आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशात जाऊन जखमींची भेट घेणार आहेत.
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी बालासोर रेल्वे अपघाताच्या ठिकाणी रात्रभर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतला. यादरम्यान बालासोरमध्ये एक हजाराहून अधिक मजूर रात्रभर ढिगारा हटवण्याचे काम करत होते. ढिगारा हटवण्याच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेमंत्र्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. 7 पोल्केन मशीन, 5 जेसीबी आणि 2 मोठ्या क्रेनच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. (हेही वाचा - Joe Biden On Odisha Train Accident: 'अत्यंत हृदयद्रावक', बालासोर येथील रेल्वे अपघाताबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांच्याकडून तीव्र शोक व्यक्त)
दरम्यान, शनिवारी रात्री मलबा हटवण्याचे काम सुरू होते तर दुसरीकडे रुळ टाकण्याचे कामही सुरू होते. रेल्वे विभागाकडून याठिकाणी रेल्वे सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातातील मृतांची संख्या 288 झाली आहे. त्याचवेळी, अपघातानंतर एकूण 1175 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी 793 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय 382 जणांवर उपचार सुरू आहेत.
#WATCH | Odisha: Aerial visuals from ANI’s drone camera show the restoration work underway at the site where the horrific #BalasoreTrainAccident took place. pic.twitter.com/QtLWITBMII
— ANI (@ANI) June 4, 2023
तथापी, शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सरकार जखमींच्या उपचारात कोणतीही कसर सोडणार नाही. अपघातात दोषी आढळणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. रेल्वे रुळ पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. मी जखमी झालेल्यांची भेट घेतली आहे.