हनिमून (Honeymoon) ला गेलेल्या एका महिलेला आपल्या पतीचे असे गुपित माहित झाले, की तिला ते समजल्यानंतर धक्काच बसला. महिलेचा आरोप आहे की, तिच्या पतीला अनेक गंभीर आजार आहेत, जे लग्नापूर्वी तिला सांगितले नव्हते. इतकंच नाही तर नवरा नपुंसक असल्याचंही महिलेला हनिमूनला गेल्यावर समजलं. त्यानंतर या महिलेने थेट पोलिस स्टेशन गाठलं.
ही घटना मध्य प्रदेशातील इंदूरमधील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथे राहणाऱ्या एका नवविवाहित तरुणीने तिचा पती आणि सासरच्यांविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिचा नवरा नपुंसक असल्याचा पीडितेचा आरोप आहे. त्याला गंभीर आजार आहेत. आजार लपवून लग्न केले आहे. हनिमूनला गेल्यावर मला तो नपुंसक असल्याचे कळले. लग्नाआधी माझ्या कुटुंबीयांकडून जबरदस्तीने पाच लाख रुपये उकळल्याचे पीडितेने सांगितले. (हेही वाचा - Bengaluru: 7 वर्षे कोमात राहून महिलेचा मृत्यू, उपचारासाठी 9.5 कोटी खर्च)
लग्नानंतर ती मुंबईत सासरच्या घरी पोहोचली आणि जवळपास आठवडाभर तिथे राहिल्याचंही पीडितेने पोलिसांना सांगितलं. यानंतर जेव्हा ती हनिमूनला गेली तेव्हा तिला समजले की, तिचा नवरा नपुंसक आहे. पीडितेने हा प्रकार तिच्या सासरच्या घरी सांगितल्यावर तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि पीडितेलाही घरातून हाकलून देण्यात आले. यानंतर तिने पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान, या संपूर्ण प्रकारानंतर नेहरू नगर भागात राहणाऱ्या नवविवाहितेने मुंबईत राहणारा पती, सासू, नंनद आणि तिचा पती यांच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पीडितेने सांगितले की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिचे लग्न झाले होते. हुंड्यासाठी सासरच्या मंडळींना पीडितेच्या कुटुंबीयांनी पैसे आणि सोने दिले. त्यानंतर विवाह झाला. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे.