Adani Group Acquires Penna Cement: अदानी समूहाने (Adani Group) आपला सिमेंट व्यवसाय (Cement Business) वाढवण्यासाठी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. अंबुजा सिमेंट्स लिमिटेड (Ambuja Cements Ltd) ने गुरुवारी पेन्ना सिमेंट (Penna Cement) इंडस्ट्रीज लिमिटेडचे 10,422 कोटी रुपयांच्या एंटरप्राइझ मूल्यावर अधिग्रहण करण्याची घोषणा केली. अंबुजा ही अदानी सिमेंटची सिमेंट आणि बांधकाम साहित्य कंपनी असून ती अदानी समूहाचा एक भाग आहे.
अंबुजा पीसीआयएलचे 100 टक्के शेअर्स त्याच्या विद्यमान प्रवर्तक गट, पी प्रताप रेड्डी आणि कुटुंबाकडून विकत घेईल. या संपादनासाठी पूर्णपणे निधी अंतर्गत जमा करण्यात येईल, असे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. (हेही वाचा -Adani Group To Enter UPI: अदानी समूह Paytm, PhonePe आणि Google Pay शी स्पर्धा करणार; कंपनी स्वत:ची UPI पेमेंट प्रणाली सुरू करण्याच्या तयारीत)
Adani Group acquires Penna Cement at Rs 10,422 crore
Read @ANI Story | https://t.co/M4PjMzWfnF#Adani #AmbujaCement #PennaCement pic.twitter.com/JUkDDnDmBC
— ANI Digital (@ani_digital) June 13, 2024
PCIL कडे 14 दशलक्ष टन सिमेंट क्षमता आहे, त्यापैकी 10 दशलक्ष टन कार्यरत आहे. उर्वरित कृष्णपट्टणम (2 दशलक्ष टन) आणि जोधपूर (2 दशलक्ष टन) येथे बांधकाम सुरू आहे आणि 6 ते 12 महिन्यांत पूर्ण होईल. दरम्यान, अहवालात म्हटले आहे की, अदानी समूह आदित्य बिर्ला समूहाच्या अल्ट्राटेकला मागे टाकून येत्या तीन ते चार वर्षांत भारतातील सर्वात मोठा सिमेंट उत्पादक बनण्याचा विचार करत आहे. समूहाने यापूर्वीच अंबुजा सिमेंट आणि एसीसी विकत घेतले आहे. अदानी समूह विक्रमी भांडवली खर्चाच्या जोरावर पायाभूत सुविधा विकास योजना पुढे नेत आहे.