AAP MLA Gurpreet Gogi (फोटो सौजन्य - X/@thind_akashdeep)

Gurpreet Gogi Died Of Gunshot: पंजाब (Punjab) मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे, लुधियाना पश्चिमेचे आमदार गुरप्रीत बस्सी गोगी (AAP MLA Gurpreet Gogi) यांचा रहस्यमय परिस्थितीत गोळी झाडून मृत्यू झाला. सह पोलिस आयुक्त जसकरण सिंह तेजा यांनी मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की, त्यांना मृत अवस्थेत डीएमसी रुग्णालयात आणण्यात आले. त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी शवागारात ठेवण्यात आला आहे. तेजा म्हणाले की, ही घटना रात्री उशिरा 12 वाजण्याच्या सुमारास घडली. गोगी यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तथापी, आपचे जिल्हा सचिव परमवीर सिंह यांनी सांगितले की, आमदार दिवसभरातील त्यांच्या नियमित कार्यक्रमांनंतर घुमर मंडी येथील त्यांच्या घरी परतले होते. ते त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या कुटुंबासोबत होते.

प्राप्त माहितीनुसार, गोगी यांच्या पत्नी डॉ. सुखचैन कौर गोगी यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांना गुरप्रीत गोगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यानंतर त्यांना कुटुंबातील सदस्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने डीएमसीएचमध्ये नेले. डीएमसीएचमध्ये त्यांना मृत घोषित करण्यात आले. (हेही वाचा - Lucknow Student Suicide: सुसाईड नोटमध्ये सॉरी आई बाबा, मी चांगली मुलगी नाही असे लिहुन तरुणीने केली आत्महत्या)

गुरप्रीत गोगी यांचा गोळी लागून मृत्यू -

उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्कूटरवरून गेल्याने आले होते चर्चेत -

दरम्यान, 2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, गोगी त्यांच्या पत्नीसह त्यांची आई परवीन बस्सी यांनी भेट दिलेल्या स्कूटरवरून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. ते हा स्कूटर त्यांच्यासाठी शूभ मानत असतं. गोगी आमदार होण्यापूर्वी किमान दोनदा महापालिकेचे नगरसेवक राहिले आहेत. ते काँग्रेस जिल्हा (शहरी) अध्यक्ष देखील होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते आपमध्ये सामील झाले.