Aaj Tak Live Streaming For Gujarat and HP Assembly Results: गुजरात आणि हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी आज, गुरुवार, 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. प्रथम पोस्टल मतपत्रिकेची मोजणी केली जाईल. या दोन्ही राज्यात भाजपचे वर्चस्व कायम राहणार की, काँग्रेस आणि केजरीवाल यांना जनतेचा कौल मिळणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. एक्झिट पोलमध्ये गुजरातमध्ये पुन्हा कमळ फुलेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हिमाचलप्रदेशमध्ये एक्झिट पोलमध्येही भाजप आणि काँग्रेसमध्ये निकराची लढत आहे. अशा स्थितीत दोन्ही पक्ष सत्तेत असल्याचा दावा करत आहेत. गुजरातमध्ये एकूण 182 जागा असून बहुमतासाठी 92 जागा हव्या आहेत. भाजपला 125 ते 130 जागा मिळण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 68 जागांसाठी 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. हिमाचलमध्ये यावेळी 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. राज्यात 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झाले होते.
आजतक वाहिनीवर सकाळी 6 वाजल्यापासून तुम्ही निवडणूक निकालांचे लाईव्ह कव्हरेज पाहू शकता. aajtak.in वेबसाइटवरही क्षणोक्षणी अपडेट्स उपलब्ध असतील. याशिवाय तुम्ही आज तक यूट्यूब चॅनलवर लाइव्ह स्ट्रीमिंगही पाहू शकता. (हेही वाचा - MCD Election Result 2022: विजय 'आप'लाच, 'झाडू ने केली कमाल, भाजपच्या कमळाचा पत्ता कट; काँग्रेसचा नाही हालला 'हात')
गुजरात-हिमाचल निवडणुकीचे निकाल थेट कव्हरेज पाहण्यासाठी खाली क्लिक करा -
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइटवर तपासले जाऊ शकतात. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाइट results.eci.gov.in वर जाऊन निकाल तपासता येतील. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजल्यापासून ट्रेंड येण्यास सुरुवात होईल.