CM Shivraj Singh Chouhan (PC - Twitter)

Sushma Swaraj Birth Anniversary: भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांची आज जयंती आहे. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी विदिशामध्ये (Vidisha) सुषमा स्वराज यांचा पुतळा बसविला जाईल, अशी घोषणा केली. रविवारी, सुषमा स्वराज यांच्या जयंतीनिमित्त काही राज्यमंत्री आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते यांच्या उपस्थितीत चौहान यांनी दिवंगत भाजप नेत्याला त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली वाहिली.

विदिशाच्या विकासात सुषमा स्वराज यांचे योगदान अतुलनीय आहे. विदिशाच्या टाऊन हॉलमध्ये त्याचा पुतळा बसविला जाईल, अशी घोषणा शिवराजसिंह चौहान यांनी केली. (वाचा - देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही - माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई)

दरम्यान, 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भोपाळपासून 58 58 किमी दूर विदिशामधून स्वराज यांनी विजयी मिळवला होता. 6 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मध्य प्रदेश विधानसभेचे सभापती रामेश्वर शर्मा, राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री विश्वास सारंग आणि अन्य भाजप नेत्यांनी रविवारी त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.