Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मॉलमध्ये काम करणाऱ्या एका 30 वर्षीय महिलेचे अपहरण करून शुक्रवारी रात्री नराधमांनी 3 तास सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडितेने मदतीसाठी दिल्ली-लखनौ महामार्गावरील पोलिसांकडे धाव घेतली. अंधाऱ्या रात्री पीडिता स्वत: ला वाचवण्यासाठी बराचं वेळ धावली.
दिल्ली-लखनौ महामार्गासारख्या व्यस्त महामार्गावर गाझियाबाद ते हापुड़पर्यंत पोलिस गस्त घालण्यात असल्याचे दावे आता उघडकीस आले आहेत. गुरुवारी रात्री नोएडाहून ड्युटीनंतर परत आलेल्या महिलेचे ऑटोमध्ये अपहरण करण्यात आले. तीन तरुणांनी पीडितेचे अपहरण करुन तिला गाझियाबादच्या पोलिस स्टेशनजवळ आणले. यानंतर तिघांनीही पीडितेला ओलीस ठेवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कारानंतर आरोपीने पीडितेला महामार्गाजवळ सोडून दिले. थंडी आणि काळ्या रात्री, एकाकी मुलगी कित्येक किलोमीटर महामार्गावर धावत राहिली. त्यानंतर तिने मसूरी पोलिस स्टेशन गाठले. परंतु, तेथे पोलिसांनी तिचे म्हणणे ऐकले नाही. पोलिसांनी घटनेसंदर्भात सर्वप्रथम जागेची पाहणी केली. त्यानंतर हे प्रकरण हापूड जिल्ह्याचे सांगत पोलिसांनी तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केली. (वाचा - लज्जास्पद! विम्याचे पैसे मिळवण्यासाठी मेरठ येथील पतीकडून बायकोची हत्या)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला रात्री नऊ वाजता गाझियाबाद येथील मॉलमध्ये आपली ड्यूटी संपवून आपल्या मैत्रिणीसमवेत सम्राट चौक विजय नगर येथे पोहोचली होती. त्यानंतर ती लालकुआं गाजियाबाद ला जाण्यासाठी ऑटोमध्ये बसली. मात्र, पीडितेचे तीन नकाधमांनी अपहरण केले आणि मसूरी सीमेजवळ तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी त्यानंतर पीडितेला महामार्गावर सोडले.
पोलिस अधिकारी नीरज जादौन यांनी सांगितले की, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. याप्रकरणी तीन जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.