
बेंगळुरू (Bangalore) स्थित एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या 26 वर्षीय महिलेवर गुरुवारी संध्याकाळी झारखंडच्या (Jharkhand) पश्चिम सिंगभूम (Singhbhum) जिल्ह्यातील चाईबासा (Chaibasa) भागात एका निर्जन ठिकाणी सामूहिक बलात्कार (Gangrape) करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांच्या एका गटाने तिला तिच्या पुरुष मित्रासोबत पाहिले तेव्हा ही घटना घडली. ती महिला बंगळुरूस्थित आयटी कंपनीत काम करते आणि ती घरून काम करत होती. आम्ही आजूबाजूच्या गावातील काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. आरोपी मुलीला ओळखत असण्याची शक्यता आहे, तथापि, आम्ही आमचा तपास करत आहोत, पश्चिम सिंगभूमचे पोलीस अधीक्षक आशुतोष शेखर म्हणाले. हेही वाचा Raging Case: नववीच्या विद्यार्थ्याला मारहाण करत केले रॅगिंग, कोंबडा बनवत नाल्यात ठेवले बसवून