Arrest | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Mukesh Ambani: तेलंगणातील एका 19 वर्षीय तरुणाला शनिवारी पहाटे मुंबईतील गमदेवी पोलिसांनी उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना अनेक धमकीचे ईमेल पाठवल्याप्रकरणी (Threatening Emails) अटक केली. पोलिसांनी आरोपीची ओळख गणेश रमेश वनपारधी असे केली असून त्याला 8 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात अंबानी यांना पाच ईमेल आले होते ज्यात पाठवणार्‍याने त्यांच्याकडून पैशांची मागणी केली होती. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे काही किशोरवयीन मुलांनी केलेले दुष्कृत्य असल्याचे दिसून येते. आमचा तपास सुरू असून आम्ही या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करू, असं मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेला दुजोरा देताना सांगितले आहे. (हेही वाचा -Mukesh Ambani Receives Threatening Emails: मुकेश अंबानी यांना आणखी दोन धमकीचे ईमेल; मागील ईमेल्सकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागण्याचा दिला इशारा)

27 ऑक्टोबर रोजी शादाब खानने कथितपणे पाठवलेल्या पहिल्या ईमेलमध्ये लिहिले होते, जर तुम्ही (अंबानी) आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, आमच्याकडे भारतात सर्वोत्तम नेमबाज आहेत. त्यानंतर, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी यांना आणखी एक ईमेल प्राप्त झाला. ज्यामध्ये प्रेषकाने म्हटले की, ते पहिल्या ईमेलवर कारवाई करण्यात अयशस्वी ठरले असल्याने त्यांना 200 कोटी रुपये हवे आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास (अंबानींना) डेथ वॉरंट जारी केले जाईल, अशा स्वरुपाची धमकी दुसऱ्या ईमेलमध्ये देण्यात आली होती.

दरम्यान, सोमवारी खंडणीखोराने अंबानींच्या अधिकृत ईमेल आयडीवर तिसरा ईमेल पाठवून 400 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर त्याला मंगळवार आणि बुधवारी असे आणखी दोन ईमेल आले. पोलिसांनी सांगितले की त्यांनी ईमेलच्या आयपी पत्त्यांची छाननी केली आणि आरोपींचा तेलंगणात शोध घेतला. या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग आहे का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत नाहीत.