मदरशात शिकणाऱ्या मुलाला मारहाण (PC - Twitter)

UP Shocker: मदरशात (Madrasa) शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाशी अमानुष वर्तन केल्याची लाजिरवाणी घटना उत्तर प्रदेशातून (Uttar Pradesh) समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील मदरशात 10 वर्षांच्या मुलाला बेड्या ठोकून बेदम मारहाण करण्यात आली. सहारनपूर जिल्ह्यातील टिट्रॉन भागातील मदरशात बेड्या ठोकलेल्या अल्पवयीन मुलाला सुमारे दोन दिवस अन्न दिलं नाही. पीडित चिमुरडा कसातरी मदरशातून निसटला आणि मोहम्मदपूर गुर्जर गावातील रहिवासी असलेल्या रामकुमारच्या घरी पोहोचला.

साखळदंडात बांधलेल्या मुलाला पाहून ग्रामस्थांना धक्काच बसला आणि त्यांनी चिमुरड्याला अग्नीपरीक्षेबाबत विचारणा केली. मुलाने सांगितले की, तो शेजारील बल्लू या गावचा रहिवासी आहे. पीडित मुलाने मदरशात झालेल्या त्रासाबद्दल सांगितलं. त्यानंतर गावकऱ्यांनी अल्पवयीन पीडित मुलाकडून तपशील घेऊन त्याच्या नातेवाईकांना बोलावले. त्याच्या कुटुंबीयांनी गावात पोहोचून मुलाला ताब्यात घेतले. (हही वाचा - Mahadev Betting App Case: मुंबई पोलिसांकडून Dabur Group Chairman Mohit V Burman, Director Gaurav V Burman यांच्याही नावाचा FIR मध्ये समावेश!)

त्यांनी मुलासह पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार नोंदवली. पोलिसांनी मदरशाचे प्रमुख आणि मुलाच्या आजोबाविरुद्ध बाल न्याय कायदा 2015 च्या कलम 75 सह संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला. सुमारे दोन दिवस मदरशात बेड्या ठोकल्यानंतर मदरसा प्रमुखावर अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप मुलाने केला.

मुलाचे वडील बिहारमध्ये फेरीवाले म्हणून काम करतात. त्याच्या आईने त्याला मदरशात शिक्षणासाठी पाठवले. त्याच्या आईने मदरशात जेवण पाठवले असतानाही त्याला जेवण दिले जात नसल्याचेही मुलाने सांगितले. मदरशाने स्पष्टीकरण देताना सांगितले की, मुलाला वाईट संगतीत असल्यामुळे त्याच्यामध्ये काही मूल्ये रुजवण्यासाठी शिक्षा देण्यात आली.

पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास करून आरोपीला पकडण्यासाठी एक पथक तयार केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.