Coronavirus प्रतिकात्मक फोटो (Photo Credit: PTI)

Coronavirus in India: भारतात मागील 24 तासांत 62,258 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या नवीन प्रकरणांपैकी 80 टक्के प्रकरण ही देशातील सहा राज्यातील आहेत. यात महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. या राज्यात कोरोना विषाणूचे नवीन प्रकरण वाढत आहे. तसेच गेल्या 24 तासांत देशातील पाच राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची टक्केवारी 76 इतकी झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, एका दिवसात कोरोनाने देशभरात 291 लोकांचा बळी घेतला आहे. यापैकी मृत्यूची 75.6 टक्के प्रकरणे महाराष्ट्र, पंजाब, छत्तीसगड, केरळ आणि कर्नाटकमधील आहेत. महाराष्ट्रात कोरोनामध्ये सर्वाधिक 112 मृत्यू आढळून आले आहेत. यानंतर पंजाबमध्ये 59, छत्तीसगडमध्ये 22, केरळमध्ये 14 आणि कर्नाटकात 13 मृत्यूची नोंद झाली आहे. (वाचा - Coronavirus in India: भारतात 62,258 नव्या रुग्णांसह कोरोना बाधितांची एकूण संख्या 1,19,08,910 वर)

महाराष्ट्रात सर्वाधिक प्रकरणे -

कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे. राज्यात एकाच दिवसात 36 हजार 902 नवीन घटना घडल्या आहेत. यानंतर पंजाबमध्ये 3122, छत्तीसगडमध्ये 2665, कर्नाटकमध्ये 2566, गुजरातमध्ये 2190 आणि मध्य प्रदेशात 2 हजार 91 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

या राज्यात 73 टक्के सक्रिय प्रकरणे -

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सध्या देशात कोरोना विषाणूची 4 लाख 52 हजार 647 सक्रिय प्रकरणे आहेत. संसर्ग झालेल्या एकूण लोकांपैकी हे प्रमाण 3.8 टक्के आहे. देशातील तीन राज्यात 73 टक्के सक्रिय प्रकरणे आहेत. ही राज्ये महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे 62.69 टक्के रुग्ण असून त्यानंतर केरळमध्ये 5.43 टक्के आणि पंजाबमध्ये 5 टक्के सक्रिय रुग्ण आहेत.

दरम्यान, गेल्या 24 तासांत देशात 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात कोरोना विषाणूमुळे एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. यात राजस्थान, जम्मू-काश्मीर, झारखंड, ओडिशा, पुडुचेरी, लक्षद्वीप, सिक्कीम, दमण आणि दीव, दादरा नगर हवेली, लडाख, मणिपूर, त्रिपुरा, मिझोरम, अंदमान-निकोबार, अरुणाचल प्रदेश यांचा समावेश आहे.