नारायणपूर जिल्ह्यात ITBP जवानांचे भांडण पोहचले शिगेला; एकमेकांवर केलेल्या गोळीबारात 6 जणांचा मृत्यू तर दोन जखमी
File image of ITBP personnel (Photo Credits: IANS)

बुधवारी सकाळी छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नारायणपूर (Narayanpur) जिल्ह्यातील, आयटीबीपीच्या शिबिरात (ITBP Camp) एका धक्कादायक घटना घडली आहे. इथल्या जवानांमधील परस्पर वादानंतर झालेल्या गोळीबारात तब्बल 6 सैनिकांचा मृत्यू झाला असून, 2 लोक जखमी आहेत. जखमी सैनिकांना हेलिकॉप्टरने रायपूर येथे हलविण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही या घटनेची पुष्टी केली आहे. पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत.

एएनआय ट्विट - 

मिळालेल्या माहितीनुसार, इथल्या जवानांमध्ये काही दिवसांपासून वाद चालू होते. त्यानंतर बुधवारी सकाळी या आयटीबीपी जवानांच्या भांडणाला सुरुवात झाली. यामध्ये दोन गट तयार झाले. यातील एका जवानाने आपल्याजवळ असलेल्या बंदुकीमधून गोळीबार सुरु केला. त्यानंतर इतरांनीही गोळीबार करायला सुरुवात केली. अखेर या घटनेमध्ये 6 जवानांचा मृत्यू झाला असून, दोन जवान जखमी झाले. (हेही वाचा: Watch Video: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यात स्वयंसेवकांकडून हवेत गोळीबार; पोलिसांकडून कारवाईचे संकेत)

मृत्यू झालेल्या जवानांची नावे –

हेड कॉन्स्टेबल महेंद्रसिंग, निवासी गाव संदियार, जिल्हा बिलासपूर, हिमाचल प्रदेश

हेड कॉन्स्टेबल दलजित सिंह, निवासी गाव जागपूर, जिल्हा लुधियाना, पंजाब

कॉन्स्टेबल मसूदुल रहमान, निवासी गाव बिलकुमारी, जिल्हा नादिया, पश्चिम बंगाल

कॉन्स्टेबल सुरजित सरकार, निवासी गाव उत्तर श्रीरामपूर, जिल्हा बर्दवान, पश्चिम बंगाल

कॉन्स्टेबल बिश्वरुप महतो, निवासी गाव खुरमुरा, जिल्हा पुसरिया, पश्चिम बंगाल

दरम्यान, बस्तर क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पी यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्तीसगड राज्यातील, नारायणपूर जिल्ह्यातील कडेनार गावात असलेल्या, आयटीबीपीच्या 45 व्या बटालियन शिबिरात ही घटना घडली.