फोटो सौजन्य - गुगल

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच एकमताने कलम 497 या कायद्याची अंमलबजावणी केली होती. त्यामुळे विवाहबाह्य संबंध असणे हा गुन्हा नसल्याचे ही न्यायलयाने स्पष्ट केले होते. मात्र न्यायलयाच्या या कायद्यानंतर एक 50 वर्षीय महिला 20 वर्षीय तरुणासोबत पळून गेल्याची विचित्र घटना सोमवारी घडली आहे.

उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे ही 50 वर्षीय महिला राहते. काही दिवसांपूर्वीच तिची एका 20 वर्षीय तरुणासोबत फेसबुकवर मैत्री झाली होती. दिवसेंदिवस या दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. त्यामुळे या दोघांनी एकत्र राहायचे ठरविले आणि त्यानुसार आपापल्या घरातून पळ कसा काढता येईल याचा विचार केला. तर या दोघांनी सोमवारी एक वेळ ठरवून मोदीनगर येथून पळ काढला आहे.

परंतु या घटनेतील महिलेच्या घरातील मंडळींनी पोलिसांकडे ती हरविल्याची तक्रार केली. तसेच पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तिचा मोबाईल सापडला आहे. या महिलेचा मोबाईल तपासला असता तिच्या फेसबुक अकाउंटवरील 20 वर्षीय तरुणासोबत तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पोलिसांनी घरातील मंडळींना सांगितले आहे. या घटनेने महिलेच्या मुलांना आणि नवऱ्याला धक्का बसला आहे.