Rajasthan Shocker: राजस्थानच्या दौसामध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी सब इन्स्पेक्टरला अटक
Stop Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

Rajasthan Shocker: राजस्थानच्या (Rajasthan) दौसा (Dausa) जिल्ह्यात शुक्रवारी एका चार वर्षांच्या मुलीवर पोलिस उपनिरीक्षकाने बलात्कार (Rape) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एएसपी रामचंद्र सिंह नेहरा यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, ही घटना जिल्ह्यातील लालसोट भागात घडली आहे. भूपेंद्र सिंग असं या आरोपी सब-इन्स्पेक्टरचं नाव आहे. आरोपीने दुपारी अल्पवयीन मुलीला त्याच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने राहुवास पोलिस ठाण्याचा घेराव करत पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. अधिकृतपणे पोलिसांच्या ताब्यात देण्यापूर्वी त्यांनी आरोपी उपनिरीक्षकालाही मारहाण केली. (हेही वाचा -UP Shocker: जुगारात हरल्यानंतर पतीने पत्नीला ठेवले गहाण; महिलेच्या भावाने येऊन वाचवली लाज, गुन्हा दाखल)

या घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पक्षाचे खासदार किरोडीलाल मीना हेही घटनास्थळी पोहोचले. किरोडीलाल यांनी सांगितलं की, लालसोट येथे एका दलित मुलीवर पोलीस कर्मचाऱ्याने केलेल्या बलात्काराच्या घटनेमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. मी निष्पाप मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी घटनास्थळी पोहोचलो आहे. आरोपी, एएसआय भूपेंद्र सिंगवर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याला लवकरच नोकरीवरून काढून टाकले जाईल. पीडित मुलीच्या कुटुंबाला शक्य तितकी मदत करण्यात येईल, असं आश्वासन मीना यांनी यावेळी दिलं.