A. R. Rahman: अमित शहांच्या हिंदी भाषेवरील वक्तव्यादरम्यान दक्षिण भारतातील अनेक नेते नाराज, एआर रहमान यांच ट्वीट चर्चेत
AR Raheman & Amit Shah (Photo Credit - FB)

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हिंदी भाषेबाबतच्या (Hindi Language) वक्तव्यावर तामिळ राजकीय पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नुकतेच अमित शहा म्हणाले होते की, वेगवेगळ्या राज्यातील लोकांनी एकमेकांशी इंग्रजीत (English) नव्हे तर हिंदीत (Hindi) संवाद साधावा. या वक्तव्यानंतर दक्षिण भारतातील (South India) अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ऑस्कर विजेते संगीतकार एआर रहमान (A. R. Rahman) यांची एक पोस्टही चांगलीच व्हायरल होत आहे. रहमान यांनी तमिळ देवी 'तमिझांगू'चे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. तमिझानंगू नावाच्या या पोस्टरमध्ये क्रांतिकारी कवी भारतीदासन यांच्या कवितेतील ओळी देखील आहेत.

रहमान यांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर केली पोस्ट

या पोस्टमध्ये त्यांनी तमिळ कवी भारतीदासन यांच्या काही ओळी लिहिल्या आहेत. ज्यामध्ये सांगितलं आहे की, तामिळ हे आपल्या अस्तित्वाचे मूळ आहे. या पोस्टवर तमिझानंगु म्हणजेच देवी तमिळ असं लिहिले आहे रहमान यांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. गुरूवारी राजभाषेवरील संसदीय समितीच्या 37व्या बैठकीत शहा म्हणाले होते की, इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी स्वीकारली पाहिजे, स्थानिक भाषा नाही.

Tweet

भाजपाकडून भारताची ओळख नष्ट करण्याचा प्रयत्न

ते म्हणाले, 'देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग राजभाषा बनवण्याची वेळ आता आली आहे. जेव्हा इतर भाषा बोलणाऱ्या राज्यांतील नागरिक एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा ते भारताच्या भाषेतच असले पाहिजे. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन म्हणाले की, भाजप सरकार भारताची बहुलवादी ओळख नष्ट करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. अमित शाह हीच चूक पुन्हा पुन्हा करत असल्याचे ते म्हणाले. रहमान यांनी भाषेबाबत अशी प्रतिक्रिया देण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2019 मध्येही त्यांनी त्रिभाषा धोरण बनवण्याबाबत ट्विट केले होते.