Shramik Special Trains (Photo Credits: PTI)

देशात 25 मे पर्यंत 3274 श्रमिक विशेष रेल्वे गाड्या (Shramik Special Trains) चालविण्यात आल्या असून त्यामध्ये 44 लाख प्रवाशांना त्यांच्या घरी पोहोचवण्यात आलं आहे. याशिवाय 25 मे रोजी 223 श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या असून याद्वारे 2 लाख 8 हजार प्रवाशांना त्यांच्या राज्यात सोडण्यात आलं. यासंदर्भात भारतीय (Indian Railways) माहिती दिली आहे.

कोरोना व्हारसच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात आतापर्यंत चार वेळा लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. या लॉकडाऊनमध्ये विविध राज्यात अनेक कामगार अडकून पडले आहेत. या सर्व कामगारांना आपल्या घरी पोहोच करण्यासाठी विविध राज्यातून श्रमिक विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या रेल्वे गाड्यांच्या माध्यमातून आतापर्यंत 44 लाखांपेक्षा जास्त मजूरांना आपल्या घरी पोहोचवण्यात आलं आहे. (हेही वाचा- Shramik Special Train: महाराष्ट्रातून परराज्यातील नागरिकांना घेऊन 145 ट्रेन सोडणार; रेल्वे मंत्रालयाची माहिती)

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सोमवारी सांगितले की, विविध राज्यात अडकलेल्या प्रवासी कामगारांसाठी भारतीय रेल्वेने 3 हजार हून अधिक श्रमिक स्पेशल गाड्या चालवल्या आहेत. देशाच्या विविध भागांमधून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात पोहोचवण्यात आले आहे. याबद्दल मला आनंद आहे, असंही पीयूष गोयल म्हणाले.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने वाहतूक वगळता द्वितीय श्रेणीची प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून दररोज 200 रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्रालयाने 30 जूनपर्यंत प्रवासी वाहतूक सुरू न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, यामुळे रेल्वे विभागाला मोठे नुकसान झाले.