नवी दिल्लीतील अनाज मंडी येथे आगीचे तांडव; 43 जणांचा मृत्यू
fire incident at Rani Jhansi Road (PC- ANI)

नवी दिल्लीतील अनाज मंडी (Anaj Mandi) परिसरातील 3 कारखान्यांना आज सकाळी लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अग्नीशमन दलाला 50 हून अधिक जणांना वाचवण्यात यश आले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची 27 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दरम्यान, अग्निशमन दलाल या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. सध्या या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

नवी दिल्लीच्या झाशी चौकातील अनाज मंडी येथे 3 कारखान्यांना आग लागली. अद्याप आगेची नेमके कारण स्पष्ट झाले नाही. 3 कारखान्यांना एकाचवेळी आग लागल्याने आगीचे स्वरुप मोठे होते. संबंधित कारखान्यांमध्ये कागदाचे बॉक्स बनवण्याचे काम होत होतं. त्याच कारखान्याला ही आग लागली. कागदामुळे आगीची तीव्रता अधिक होती. (हेही वाचा - उन्नाव येथील दुष्कर्माविरोधात सफदरजंग रुग्णालयाबाहेर एका अंदोलनकर्त्या महिलेचा 6 वर्षीय चिमुकलीला जाळण्याचा प्रयत्न)

या घटनेमध्ये कारखान्यातील मजुरांचे प्रमाण अधिक होते. या कारखान्यांमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे जखमी झालेल्यांना उपचारासाठी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.