Pakistani Child Entered The Indian Border (PC - Twitter)

Pakistani Child Entered The Indian Border: देशाच्या सीमेवर घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्यांना पकडून तुरुंगात पाठवले जाते किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर गोळ्या झाडल्या जातात. दुसरीकडे, फिरोजपूरमध्ये भारतीय सीमेवर पोहोचलेल्या 3 वर्षांच्या पाकिस्तानी बालकासाठी बीएसएफ अधिकारी आणि जवानांनी दाखवलेल्या औदार्याबद्दने सर्वजण धक्क झाले आहेत. अवघ्या तीन वर्षांचा हा मुलगा नकळतपणे पापा-पापा म्हणत भारतीय हद्दीत घुसला होता.

येथे उपस्थित सीमा सुरक्षा दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत घातली. त्यांनी या मुलाला चॉकलेट दिले. त्यानंतर दुसऱ्या बाजूला तैनात असलेल्या पाकिस्तानी रेंजर्सना याची माहिती देण्यात आली. काही वेळाने मुलालाही नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. (हेही वाचा - Alt News co-founder Mohd Zubair यांची जामीन याचिका Patiala House Court ने फेटाळला; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी)

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी उशिरा एक पाकिस्तानी बालक फिरोजपूर सेक्टरमधील एका चौकीतून भारतीय हद्दीत घुसले होता. तेथे तैनात असलेल्या बीएसएफच्या जवानांनी अलर्ट मोडवर मुलाच्या हालचालीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि त्याला पुढे येऊ दिले. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालक खूपच लहान असून त्याचे नाव आणि पत्ता सांगू शकला नाही.

हा मुलगा फक्त पप्पा-पप्पा बोलत होता. त्याला अनोळखी लोकांना पाहून धक्काच बसला. त्यानंतर जवानांनी त्याला खाऊ आणि चॉकलेट देऊन गप्प केले. प्रसंगावधान राखून पाकिस्तानी रेझरशी संपर्क साधून मुलाला तातडीने त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर बीएसएफने मुलाला वडिलांच्या ताब्यात दिले.