Tamil Nadu Accident Video: धर्मपुरी येथील महामार्गावर 3 ट्रक आणि कारची धडक, अघातात ट्रक खाली कोसळला (Watch Video)
Tamilnadu Accident PC Twitter

Tamil Nadu Accident Video: तामिळनाडूच्या धर्मापुरी येथील थोपपूर घाट येथे बुधवारी पहाटे तीन ट्रक आणि कार यांच्यात धडक झाली आणि यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात महामार्गावरील लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याक कैद झाला असून या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतल्याचे व्हिडिओ दिसत आहे. (हेही वाचा- यवतमाळ येथे ट्रक आणि कारच्या धडकेत भीषण अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी)

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहने धर्मापूरीहून सालेमच्या दिशेने जात असताना एका ट्रेलर ट्रकच्या चालकाने वाहनावरील नियत्रंण सुटल्याने हा अपघात झाला आणि अन्य वाहनांवर जाऊन आदळला. अचानक एका चालकाचे ट्रेलर ट्रकवरून नियत्रंण सुटल आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकवर जाऊन आदळला, या दोन ट्रकच्या धडकेनंकर आणखी एका ट्रकची धडक बसली.

धडकेत कारही अडकली आणि धडक एवढी भीषण होती ती त्यातील एक ट्रक पूलावरून खाली कोसळलं. अपघातानंतर ट्रक आणि कारने पेट घेतला. घटनेची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन घटनास्थळी पोहचून आग विझवण्याचे काम सुरु केले. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी मृतांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. जखमींना धर्मपूरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.